शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

लान्सनायक हनुमंतप्पांचे निधन

By admin | Updated: February 12, 2016 04:18 IST

सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांची गत दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर गुरुवारी

नवी दिल्ली : सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात बर्फाखाली गाडले गेलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांची गत दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर गुरुवारी संपली. गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता या लढवय्या जवानाने अखेरचा श्वास घेतला.हनुमंतप्पांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. हनुमंतप्पा राहत असलेल्या बेटादूर गावावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह संपूर्ण देशाने हनुमंतप्पांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. गत दोन दिवसांपासून हनुमंतअप्पा यांचे प्राण वाचविण्यासाठी येथील आर्मी रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न चालवले होते. पण गुरुवारी हनुमंतअप्पांची प्रकृती आणखीच खालावली आणि ११.४५च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते. मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने शिवाय दोन्ही फुप्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती; याशिवाय त्यांच्या विविध इंद्रियांनीही काम थांबवले होते. ३ फेबु्रवारीला १९,६०० फूट उंचीवरील सियाचीनमध्ये हिमकडे कोसळल्यामुळे ‘१९ मद्रास बटालियन’चे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. सियाचीनच्या बर्फाच्छादीत भागात बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशिरा हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते. यानंतर लगेच त्यांना खास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.कर्नाटकच्या धारवाडच्या बेटादूर गावात राहणारे हनुमंतअप्पा १३ वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते. लष्करातील आपल्या एकूण १३ वर्षांच्या सेवेपैकी सलग १० वर्षे त्यांनी अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात कर्तव्य बजावले. जोखमीच्या मोहिमांसाठी सतत सज्ज असलेला आणि उच्च ध्येयाने भारावलेला जवान अशी हनुमंतअप्पांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी महादेवी अशोक बिलेबन आणि दोन वर्षांची मुलगी नेत्रा असा परिवार आहे.बेटादूर गावावर शोककळाजिगरबाज हनुमंतप्पांच्या निधनाचे वृत्त धडकताच बेटादूर या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईक, मित्रपरिवार, बेटादूर गावासोबतच आजूबाजूच्या गावांतील लोक आणि मीडियाने हनुमंतप्पांच्या घराकडे धाव घेतली. हनुमंतप्पांची पत्नी महादेवी आपल्या दोन वर्षांची मुलगी व काही जवळच्या नातेवाइकांसह दिल्लीत आहे. हनुमंतप्पांचे अन्य कुटुंबीय मात्र गावातच आहेत. हनुमंतप्पांच्या निधनाची वार्ता ऐकताच त्यांना शोक अनावर झाला.हनुमंतप्पा यांचा मृत्यू चटका लावून गेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. हनुमंतप्पा गेले, पण त्यांच्यातील सैनिक अमर आहे. भारतमातेची सेवा करणाऱ्या तुम्हा शहिदांचा आम्हाला अभिमान आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान