शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:00 IST

काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या

बंगळुरु: काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या आशा-आकांक्षांशी फारकत झाल्याचे द्योतक आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.कर्नाटक दौ-यात बंगळुरू येथे भाजपा कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कालपर्यंत सत्तेवर असलेले अचानक पलटी खाऊन निर्लज्जपणे काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करू लागले आहेत. काश्मीरसाठी प्राणाहुती देणाºयांच्या हौतात्म्याचे राजकारण करणाºयांकडून देशाच्या विकासाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. काँग्रेसला याचा जाब द्यावा लागेल.देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे सांगत पंतप्रधान म्हणाले की, हा देश सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. सरदार पटेलांनी देशाची सुरक्षा आणि एकात्मता यासाठी अनेक निर्णय खंबीरपणे घेतले. काश्मीरसाठी हजारो युवकांनी प्राणांची आहुती दिली आहे. काश्मीरसाठी हौतात्म्य दिले नाही, असे देशात एकही राज्य नाही.मोदी म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण होता; पण काँग्रेसच्या ते पचनी पडले नाही. सर्जिकल स्ट्राइकने काँग्रेसला पोटशूळ का उठला हे आता त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (वृत्तंसस्था)जनतेपासून त्यांची नाळ तुटलीदेशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांपासून काँग्रेसची नाळ तुटली आहे, असा दावा करत मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांचा त्याग, भारताची प्रभावी राजनैतिक मुत्सद्देगिरी व भारताचे धाडस यामुळे डोकलामचा तिढा सुटला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी भारत ठामपणे उभा राहतो हे त्यावरून दिसले. याबद्दल जग भारताकडे कौतुकाने पाहत असताना काँग्रेसवाले मात्र डोकलामवरून अपप्रचारकरीत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी