शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 06:58 IST

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ग्राउंडवर अनोख्या विक्रमाची नोंद

जबलपूर : हौशी बाइकस्वारांनी अनेक प्रकारे बाइक चालविण्याचे विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यात बाइकवर उभे राहणे, हँडल सोडून चालविणे, हँडलवर बसून चालविणे, पुढच्या चाकावर बसून चालविणे, कॅरिअरवर बसून चालविणे आदींचा समावेश आहे, परंतु जालना जिल्ह्यातील मांडवा गावचे लान्स नायक गजानन बबनराव मिसाळ यांनी बुधवारी बुलेटच्या मागच्या लाइटवर बसून १०० किलोमीटरहून अधिक अंतर चालविण्याचा विश्वविक्रम केला. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे त्यांनी केलेल्या या विश्वविक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे.गजानन मिसाळ जबलपूर येथील लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या डेअर डेव्हिल्स या टीमचे सदस्य आहेत. सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या गौरीशंकर परेड ग्राउंडवर त्यांनी हा विश्वविक्रम केला. यासाठी त्यांनी दोन वर्षे मेहनत घेतली होती. गजानन या विश्वविक्रमाचे श्रेय परमेश्वर, त्यांचे माता-पिता आणि डेअर डेव्हिल्स या ग्रुपला देतात. मूळ गावी शेतीची कामे करून घर चालविणारे त्यांचे आई-वडील हा विश्वविक्रम पाहण्यासाठी जबलपूरला आले होते. सोबत त्यांचा भाऊही आला होता. मुलाच्या या विश्वविक्रमाबाबत आपल्याला खूप अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. विश्वविक्रम पाहण्यासाठी मध्य कमांडचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्या.संजय यादव आणि न्या.सुजॉय पॉल आदी मान्यवर उपस्थित होते.दोन तास २७ मिनिटांत केला पराक्रम  सकाळी ८.३५ वाजता बाइकच्या मागच्या लाइटवर बसून ती चालविणे सुरू केले. त्यानंतर, त्यांनी काही मिनिटांत मैदानाचा ४५० मीटरचा एक फेरा पूर्ण केला.  अगदी शांत व संयमाने बाइक चालवत त्यांनी एकेक करून मैदानात तब्बल २४९ फेऱ्या पूर्ण करीत तब्बल १११ किलोमीटरचे अंतर कापले. त्यांना दोन तास २७ मिनिटे आणि ५४ सेकंद इतका वेळ लागला.  डेअर डेव्हिल्स या ग्रुपच्या नावावर आजवर एकूण २९ विश्वविक्रमांची नोंद झाली आहे.