शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या थोरल्या मुलाने नेत्यांवर उगारला हात; तेजप्रताप पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:28 IST

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम)  या पक्षाचा दावा आहे की, इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर हात उचलला.  

एस. पी. सिन्हापाटणा :  राष्ट्रीय जनता दलाचे  (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव पुन्हा चर्चेत आले आहेत. लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांतर्फे आयोजित इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आरजेडीच्या दोन नेत्यांवर हात उगारल्याची चर्चा आहे. घटनादर्शींनुसार विधान परिषद निवडणुकीतील भोजपूरमधील आरजेडीचे उमेदवार अनिल सम्राट यांच्यावर तेजप्रताप यादव यांनी हात उगारला होता. सूत्रांनुसार अनिल सम्राट यांंनीही ‘जशास तसे’ उत्तर दिले. तेथे उपस्थित लोकांनी दोघांना दूर नेले.

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवामी मोर्चा (हम)  या पक्षाचा दावा आहे की, इफ्तार पार्टीदरम्यान तेजप्रताप यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर हात उचलला.   हम पक्षाचे प्रवक्ते दानिश रिजवान यांनीही या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, शुक्रवारी राबडीदेवी यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनिल सम्राट हेही आले होते. त्यांना पाहून तेजप्रताप भडकले आणि त्यांच्यावर हात उगारला. त्यांनीही त्याचप्रकारे उत्तर दिले. नंतर तेथे उपस्थित लोकांनी दोघांना शांत केले.अनिल सम्राट यांनी डिजिटल मीडियावर तेजप्रताप यांच्याबाबतीत काही अपशब्द वापरले होते. त्यावरून तेजप्रताप हे सम्राट यांच्यावर नाराज होते. ते याचा सूड घेण्याची संधी शोधत होते. संधी मिळताच तेजप्रताप यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा प्रकार त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला, असे  रिजवान यांनी सांगितले.

इफ्तार पार्टीत एकाकी पाडण्याचा बेतयाच दरम्यान, आरजेडीच्या महानगर अध्यक्षांनाही मारहाण झाल्याची घटना घडली. आरजेडीमध्ये सर्वात लोकप्रिय युवा नेते तेजप्रताप आहेत. त्यांच्याविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्या आमदारांविरुद्ध कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रकार  तेजस्वी किंवा मिसा यांच्याबाबतीत घडला असता, तर आतापर्यंत त्या नेत्याची पक्षातून  हकालपट्टी झाली असती. इफ्तार पार्टीत काही नेत्यांचा तेजप्रताप यांना एकाकी पाडण्याचा बेत होता. तेजप्रतापविरुद्ध आरजेडी नेत्याला  अपशब्द बोलायला लावले होते, असा आरोप दानिश रिजवान यांनी केला.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव