शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लालू प्रसाद यादव यांच्या मिसा भारतीवर आरोपपत्र दाखल, मनी लाँड्रिंगचे प्रकरण भोवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:01 IST

लालू प्रसाद यादव यांची कन्या व राज्यसभा सदस्य मिसा भारती यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी आरोपपत्र दाखल केले असून, मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवला आहे.

नवी दिल्ली : लालू प्रसाद यादव यांची कन्या व राज्यसभा सदस्य मिसा भारती यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी आरोपपत्र दाखल केले असून, मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवला आहे. त्यांचे पती शैलेंद्र यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव यांनाही आजच तुरुंगात जावे लागले.ईडीचे वकील नितेश राणा यांनी विशेष न्या. एन. के. मल्होत्रा यांच्या न्यायालयात हे आरोप दाखल केले. याआधी तपास करीत असताना मिसा भारती यांच्या दिल्लीमधील फार्महाउसवर ईडीने टाच आणली होती. या फार्महाउसची किंमत सुमारे ३0 ते ४0 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. फार्महाउस खरेदी करताना त्यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. ते विकत घेण्यासाठी मिसा भारती व त्यांचे पती शैलेश कुमार यांनी सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन यांच्या कंपनीचा वापर केल्याचाही आरोप आहे.करोडो रुपयांच्या बेनामी संपत्तीमुळे मिसा भारती व शैलेश कुमार ब-याच काळापासून ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने ८ जुलै रोजी मिसा व शैलेश कुमार यांच्या दिल्लीमधील तीन ठिकाणी छापे घातले होते.जैन बंधूंना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली अटक झाली आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवालयांनाही ईडीने अटक केली आहे. त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते.२२ कंपन्यांवर धाडीप्राप्तिकर विभागाने दिल्ली व गुरुग्राम येथील लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्यांसह २२ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. यादव कुटुंबीयांनी काही हजार कोटींचे घोटाळे केल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव