शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लालूंना १४ वर्षे शिक्षा; चौथ्या चारा घोटाळ्याचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 05:42 IST

चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी दोषी ठरविले असून, त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

- एस. पी. सिन्हारांची/पाटणा : चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी दोषी ठरविले असून, त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा त्यांना वेगवेगळ्या भोगाव्या लागणार आहेत. लालू यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात आधीच्या घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.या दोन्ही कलमान्वये लालू यादव यांना प्रत्येकी ३0 लाख याप्रमाणे ६0 लाख रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्यांना आणखी एक वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे. याखेरीज अन्य दोषींना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाने हा निकाल सुनावला.आतापर्यंतचे तीन व आज अशा चार प्रकरणांत मिळून लालू प्रसाद यादव यांना २0 वर्षे व ६ महिने शिक्षा झाली आहे. रांची न्यायालयाने या चौथ्या चारा घोटाळ्यात १२ जणांना दोषी ठरवले असून, १९ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.बिहारचे मुख्यमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी डिसेंबर १९९५ ते डिसेंबर १९९६ या काळात दुमका येथील कोषागारातून अवैधरीत्या ३ कोटी ७६ लाख रुपये काढल्याचा आरोप आहे. दुमका आता झारखंडमध्ये आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यांना १९ मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले. मार्चला यावर निर्णय झाला व त्यांना दोषी ठरवले.लालू यादव यांना चारा घोटाळ्याच्या पहिल्या प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांना डिसेंबर २0१७ मध्ये साडेतीन वर्षांची शिक्षा देण्यात आली. तिसºया प्रकरणातही ते दोषी आढळले आणि त्यांना जानेवारी २0१८ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली.जामिनासाठी अर्जरांचीच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेणाºया लालूंनी झारखंड हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याची सुनावणी ६ एप्रिल रोजी होईल.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार