शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या कन्या मिसा भारतींना ईडीने बजावला समन्स

By admin | Updated: July 10, 2017 17:15 IST

राज्यसभा खासदार मिसा भारती यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी समन्स बजावला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी समन्स बजावला आहे. 
गेल्या शनिवारी मिसा भारती, त्यांचे पती शैलेश कुमार यांच्या दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, फोन आणि काही कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयाने जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आज मिसा भारती यांच्यासह त्यांचे पती शैलेश कुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने पीएमएलए कायद्याअंतर्गत समन्स पाठविला आहे. 
दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी धाडी टाकल्या होती. ही फार्महाउस मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार अॅन्ड मेसर्स मिसाइल प्रिंटर्स अॅन्ड पॅकर्स प्रा.लि.शी संबंधित आहेत. तसेच, यासंबंधी आणखी दोन ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे लक्ष असून, त्यांचा तपास लवकरच करण्यात येणार असल्याचे एका सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांने सांगितले. 
(लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत, ईडीनं सीएला ठोकल्या बेड्या)
(लालूंच्या कन्या मीसा भारती यांची मालमत्ता जप्त)
(बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : मिसा भारतींची 12 जूनला होणार चौकशी)
दरम्यान, 8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, सक्तवसुली संचालनालयाने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. तसेच, गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.