शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ललित मोदी बेभान; दिल्लीत अस्वस्थता

By admin | Updated: June 26, 2015 02:09 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्यासह इतर अनेकांच्या बाबतीत एका पाठोपाठ एक रहस्योद्घाटन करीत असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित

हरीश गुप्ता, नवी दिल्लीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्यासह इतर अनेकांच्या बाबतीत एका पाठोपाठ एक रहस्योद्घाटन करीत असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी प्रक्षुब्ध झालेले असले तरी भाजपा नेतृत्वाने मात्र कठोरपणे वागण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाच्या चार महिला मंंत्र्यांपैकी कुणाचाही बळी दिला जाणार नाही, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी निवडक पत्रकारांना सांगितले.संपुआच्या राजवटीत फायदा झालेल्या सर्व शीर्ष नोकरशहा, राजकीय पुढारी, मीडिया घराणे आणि अन्य लोकांचा आपण पर्दाफाश करणार असल्याची धमकी ललित मोदी यांनी टिष्ट्वटरवरून दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वही जाम हादरले आहे. राष्ट्रपती भवनाने मात्र मोदींच्या आरोपाचे खंडन केले. परंतु २००९-१२ दरम्यान वित्त मंत्रालयात घडलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची धमकीही ललित मोदी यांनी दिल्याने आता त्यांच्या टिष्ट्वटरवर पुढे काय प्रकटणार, याबाबत दिल्लीत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या कारणामुळेच की काय काँग्रेसने आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याऐवजी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाच आपले लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. हा वाद आणखी चिघळू नये असे वाटत असल्यानेच काँग्रेसने राजेंकडे आपले लक्ष वळविल्याचे समजते.राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदीगेट प्रकरण हे दुसरे जैन हवाला प्रकरण ठरण्याची शक्यता आहे, ज्यात ९० च्या दशकात अनेक शक्तिशाली राजकारणी आणि नोकरशहांना मोठा लाभ झालेला होता. या जैन हवाला प्रकरणात किमान दहा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. परंतु काही वर्षांनंतर हे प्रकरण थंड झाले. १९९५ मध्ये जैन हवाला प्रकरण बाहेर आल्यानंतर दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव यांनी जे काही केले त्याची पुनरावृत्ती व्हावी, असे नरेंद्र मोदी सरकारला अजिबात वाटत नाही.दरम्यान ललित मोदी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांना आपले लक्ष्य बनविण्याचे ठरविल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे असे दिसते. ललित मोदींच्या विरोधात कोणतीही गोष्ट मोदी सरकारने गेल्या वर्षभरात केलेली दिसत नाही.