शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lal Bahadur Shastri Jayanti: त्या रात्री काय झालं होतं, जाणून घ्या लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:14 IST

खोलीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, पंतप्रधानांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- वर्षं 1965मध्ये भारत पाकिस्तानमध्ये युद्ध संपून काहीच दिवस झाले होते. नवं वर्षं सुरू होणार होतं. खरं तर त्या दिवसांत दिल्लीत कडाक्याची थंडी होती. परंतु भारत-पाक सीमेवर दारूगोळ्याचा वास आणि गोळ्यांचा आवाज सर्वांच्या कानात घुमत होता. याच दोन्ही देशांमध्ये शांती वार्ता करण्याचं ठरलं आणि जागाही निश्चित झाली. चर्चेची जागा भारत आणि पाकिस्तानऐवजी ताशकंद निवडण्यात आली. तत्कालीन सोव्हिएत रशियांच्या अंतर्गत येणा-या ताशकंदमध्ये 10 जानेवारी 1966मध्ये भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्यात बैठक ठरली.10 जानेवारी 1966ला पहाटे थंडी जरा जास्तच होती. खरं तर भारतीय मंत्रिमंडळाचा ही थंडी सोसण्याची सवय नव्हती. भेटीची वेळ पहिल्यापासूनच ठरलेली होती. लाल बहादूर शास्त्री आणि अयुब खान यांची भेट ठरलेल्या वेळेत झाली. चर्चा बराच वेळ सुरू राहिली आणि अखेर दोन्ही देशांमध्ये शांती करार करण्यावर एकमत झालं. त्यामुळे दोन्ही देशांकडून आलेलं प्रतिनिधीमंडळ खूश झालं. परंतु ती रात्र भारतासाठी काळरात्र ठरली. 10 ते 11 जानेवारीदरम्यान लाल बहादूर शास्त्रींची संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी या घटनेचा उल्लेख त्यांची आत्मकथा 'बियॉन्ड द लाइंस (Beyond the Lines)'मध्ये केला आहे.ते लिहितात, मध्यरात्रीनंतर अचानक माझ्या रुमची बेल वाजली. दरवाज्यासमोर एक महिला उभी होती. ती म्हणाली की, तुमच्या पंतप्रधानांची परिस्थिती गंभीर आहे. मी धावत-पळतच त्यांच्या खोलीत गेलो. तोपर्यंत उशीर झाला होता. खोलीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की, पंतप्रधानांचा मृत्यू झाला आहे. त्या ऐतिहासिक कराराच्या काही काळातच भारतासाठी सर्व परिस्थिती बदलली होती. दुस-या देशात लाल बहादूर शास्त्रींचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं भारतात शोकाकुल वातावरण होते.लोक दुःखी होतेच, परंतु त्यापेक्षा जास्त हैराण होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागली. तसेच लाल बहादूर मृत्यूमागे संशय व्यक्त केला जाऊ लागला. विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूची प्रत्यक्षदर्शी असलेली त्यांची चिकित्सक आणि नोकर रामनाथ यांची रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचं गूढ आणखी वाढलं. लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर सरकारनं राज नारायण समिती बनवली. या समितीनं तपास केला. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, पुढे त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलंच नाही. 

टॅग्स :Lal Bahadur Shastriलाल बहादुर शास्त्री