शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

रिक्षाचालकाने घेतली लेकीसाठी लाखांची रायफल

By admin | Updated: August 28, 2016 00:32 IST

राष्ट्रीय पातळीवर नेमबाजीची खेळाडू असलेल्या आपल्या लेकीसाठी येथील रिक्षाचालक पित्याने पाच लाख रुपयांची जर्मन बनावटीची रायफल विकत घेतली. तिच्या लग्नासाठी

अहमदाबाद : राष्ट्रीय पातळीवर नेमबाजीची खेळाडू असलेल्या आपल्या लेकीसाठी येथील रिक्षाचालक पित्याने पाच लाख रुपयांची जर्मन बनावटीची रायफल विकत घेतली. तिच्या लग्नासाठी त्याने हे पैसे जमविले होते. मणिलाल गोहिल असे या पित्याचे तर मित्तल हे मुलीचे नाव आहे.मणिलाल आणि मित्तल हे दोघे रायफलचा परवाना घेण्यासाठी येथील पोलीस आयुक्तांकडे गेल्यावर ही बातमी उघड झाली. रिक्षाचालकाने एवढ्या मोठ्या रकमेची रायफल विकत घेतल्यावर अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सुदैवाने पोलिसांनी या बापलेकीला आवश्यक तो परवाना मिळवून देण्यास मदत केली आणि मणिलाल यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. नेमबाजी (शूटिंग) हा माझा खर्चिक छंद जोपासण्यासाठी माझ्या आईबाबांनी खूप काही त्याग केला आहे. आता ही रायफल मिळाल्यामुळे मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खूप कष्ट करेन, असे मित्तल म्हणाली. मित्तल आईवडील व दोन भावांसह येथील गोमतीपूर भागातील चाळीत राहते. ती गेल्या चार वर्षांपासून शूटिंगचा सराव करते. अहमदाबादेतील रायफल क्लबने तिला शूटिंगमध्ये उत्तीर्ण केल्यानंतर आणि काही नेमबाज सराव करताना बघून तिच्यात शूटिंगचे वेड शिरले. आपल्यालाही रायफल मिळाली पाहिजे याचा तिला ध्यास लागला. मणिलाल गोहिल यांच्या कुटुंबाचे चरितार्थाचे साधन केवळ रिक्षाच आहे. मित्तलचा एवढा खर्चिक छंद त्या कुटुंबाला झेपणारा नव्हता. या पदकाने मित्तलचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. परंतु पुढील प्रशिक्षण व स्वत:ची नसलेली रायफल यामुळे तिच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. तिचे वडील व तिचा मोठा भाऊ जैनिश हे दोघेही ५० मीटर रेंजची जर्मन बनावटीची रायफल विकत घेण्यासाठी पैशांची जमवाजमव करू लागले. मित्तलच्या लग्नासाठी बाजुला काढून ठेवलेले पैसे रायफलसाठी वापरावे लागणार होते. एवढे पैसे रायफलवर खर्च करणे हे गोहिल कुटुंबासाठी कठीणच काम होते परंतु आता मित्तलला स्वत:ची रायफल उपलब्ध झाली असून ती येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. (वृत्तसंस्था)मिळवले कांस्य पदकमणिलाल यांनी आपल्या मुलीला नेमबाजी सोडून दे असे म्हटले नाही. त्यांनी तिला रायफल क्लबमध्ये नेले आणि तेथे तिला भाड्याने गन उपलब्ध करून दिली. २०१३ मध्ये फारच कमी सराव असतानाही मित्तल ५७ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाली आणि त्यात तिने कास्य पदक मिळविले. तिच्यासोबत होत्या अंजू शर्मा व लज्जा गोस्वामी या खेळाडू.