शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित
८० टक्के शेतकर्‍यांनाच मदत, शासनाकडून निधीच मिळेना
औरंगाबाद : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज दिले असले तरी जिल्ह्यातील सुमारे ९५ हजार शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. शासनाकडून ८० टक्केच निधी मिळाल्याने जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनाच ही मदत मिळालेली आहे. उर्वरित शेतकर्‍यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे या शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी सलग तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. गतवर्षी फेबु्रवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दुष्काळामुळे खरीप हंगामही गेला. आता रबी हंगामात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे अनेक शेतकर्‍यांना शासनाने आधी जाहीर केलेली दुष्काळी मदतही मिळालेली नाही. खरीप हंगामाच्या नुकसानीपोटी शासनाने डिसेंबरअखेरीस शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले. त्यांच्यासाठी एकूण २८८ कोटी रुपयांच्या निधीची गरज होती; परंतु शासनाने दोन टप्प्यात यातील ८० टक्केच म्हणजे २३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीचे वाटप नुकतेच पूर्ण झाले. त्यातून जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनाच मदत मिळाली. अजूनही ९५ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी तिसर्‍या टप्प्यात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, दुसर्‍या टप्प्याचे वाटप पूर्ण होऊनही तिसर्‍या टप्प्यातील निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला नाही. मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील १८ हजार, पैठणमधील ८ हजार, फुलंब्रीतील ३ हजार, वैजापूर १९ हजार, गंगापूर ८ हजार, खुलताबादेतील ५ हजार, तर सिल्लोडमधील २५ हजार आणि कन्नड तालुक्यातील १९ हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे.

तालुकाएकूण शेतकरीमदत मिळालेले शेतकरी
औरंगाबाद६२,७५६ ४४,४५५
पैठण८२,८२९ ७४,८२९
फुलंब्री४६,०४७ ४२,७३८
वैजापूर१०,०५९३ ८१,७७४
गंगापूर७७,००४ ६९,१०७
खुलताबाद२७,३१८ २२,७२६
सिल्लोड७४,१७९ ५५,११३
कन्नड८३,४६९ ६४,२८४
सोयगाव२६,७२१ २६,७२१
-------------------------------------------
एकूण५,८०,९१६४,८५,८३७
-------------------------------------------