शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पाकीटबंद अन्न उद्योगात येणार चैतन्य; राज्ये ठरवणार स्वत:चे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 05:20 IST

मुलांना शिजविलेले की पाकिटबंद तयार अन्न द्यायचे? हा केंद्रीय मंत्रालये व राज्य सरकारांतील वाद पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) मिटविला आहे.

हरिश गुप्तानवी दिल्ली : मुलांना शिजविलेले की पाकिटबंद तयार अन्न द्यायचे? हा केंद्रीय मंत्रालये व राज्य सरकारांतील वाद पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) मिटविला आहे. आरोग्य, तसेच महिला व बालविकास मंत्रालयांनी मुलांना शिजविलेले अन्नच देण्याची गरज असल्याची शिफारस केली, तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पाकीटबंद अन्नाची बाजू लावून धरली होती. राज्यांशी झालेल्या चर्चेनंतर तज्ज्ञ समितीचे अहवाल व संबंधित मंत्रालयांचा दृष्टिकोन ऐकून, पीएमओने राज्यांना त्यांचे स्वत:चे धोरण ठरवायची मुभा दिली आहे. राज्यांना जर पाकीटबंद अन्न द्यावे, असे वाटत असेल, तर ते तसे करू शकतात, असे पीएमओने म्हटले आहे.या निर्णयामुळे पाकीटबंद अन्न तयार करणा-या उद्योगाला चैतन्य मिळाले आहे. बाजारपेठेतील पतंजली फूड्स, आयटीसी व इतर मोठ्या कंपन्यांसाठी वरील निर्णय फायदेशीर ठरणार आहे. पीएमओने संबंधित दोन केंद्रीय मंत्रालयांच्या बाजूला सारून हा निर्णय घेतला आहे. ही मंत्रालये मुलांना पाकीटबंद अन्न द्यायच्या विरोधात होती.तथापि, पीएमओने स्पष्ट केले आहे की, एकात्मिक बालविकास सेवांमध्ये (इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस) ३-६ वर्षांच्या मुलांना यापुढेही शिजविलेले अन्न दिले जावे. त्यामुळे ती योजना पुढेही सुरूच राहील, परंतु सहा वर्षांपुढील मुलांना पाकीटबंद अन्न देण्याची योग्य-अयोग्यता ठरविण्याचा अधिकार राज्यांना असेल. मनेका गांधी यांच्या महिला व बालविकास मंत्रालयाने पाकीटबंद अन्न मुलांना देणे हे धोरणाविरुद्ध आहे, असा आदेश दिल्याने संघर्ष सुरू झाला. त्यामुळे प्रकरण पीएमओकडे गेले.आरोग्य मंत्रालयाने पाकीटबंद अन्नात जे पौष्टिक घटक असतात, त्यापेक्षा त्यांचा चांगला दर्जा शिजविलेल्या अन्नात असतो, असे मत व्यक्त केले होते.मंत्रालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली. तथापि, राज्यांनी त्या दाव्याला आव्हान दिले. ही योजना त्यांना त्यांच्या पद्धतीने राबवायची असल्याचे स्पष्ट केले. या योजनेला केंद्राकडून ५० टक्के निधी मिळतो. पाकीटबंद अन्न वापरण्याचे धोरण काही सरकारांनी स्वीकारलेले नाही, हे आरोग्य मंत्रालयाने २००९ मध्येच सांगितले होते.खाण्याच्या सवयींवर परिणाम होत नाहीकेंद्र सरकारने २०१३ मध्ये झारखंडला पाकीटबंद अन्नाचे वितरण थांबविण्यास सांगितले होते. मात्र, आंतर-मंत्रालये गटात एकवाक्यता नव्हती.पाकीटबंद अन्नाचा उपयोग तात्पुरता असतो व त्यामुळे कुटुंबाच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होत नाही, असे म्हटले होते.पाकीटबंद अन्नाच्या वापरामुळे कुटुंबात मुले जे अन्न खातात, त्यांच्या सवयी बदलल्या जातील, याकडे महिला आणि बालविकास मंत्रालयाने लक्ष वेधले होते.

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी