ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ८ - गोमांस खाणे हे आरोग्यासाठी अपायकारकच आहे असा कुराणातही म्हटल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे. मात्र गुजरात सरकारच्या या वादग्रस्त जाहिरातींवरुन वाद निर्माण झाला असून आम्ही कुराणात कुठेच हा उल्लेख वाचलेला नाही असे मुस्लिम धर्मगुरुंचे म्हणणे आहे.
सध्या गुजरातमधील विविध भागांमध्ये मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टरवर इस्लाम धर्माचे चिन्हही लावण्यात आले आहे. गुजरात सरकारच्या गोसेवा व गोचर विकास बोर्डाने हे फलक लावले आहेत. उर्दू भाषेतील या पोस्टर्सवर गोरक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गायीच्या दुधात व त्यापासून तयार होणा-या तुपामध्ये अनेक गुणधर्म असतात. याऊलट गोमांसामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते असे या पोस्टरवर म्हटले आहे. कुराणामध्येही गोरक्षेचे समर्थन करण्यात आले आहे असा दावाही या जाहिरातींमध्ये करण्यात आला आहे.
गुजरातमधील मुस्लिम संघटनांनी या जाहिरातींचा विरोध दर्शवला आहे. मुस्लिमांची दिशाभूल करणारी ही जाहिरात असून कुराणात कुठेही असा उल्लेख नाही असा दावा ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाच्या सदस्याने केला आहे. तर