शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामी यांना काँग्रेसचा पाठिंबा पूर्ण पाच वर्षांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:03 IST

कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असतील, त्यांना पुढील पाच वर्षे आमचा पाठिंबा असेल, हे काँग्रेसने स्पष्ट केले

बंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असतील, त्यांना पुढील पाच वर्षे आमचा पाठिंबा असेल, हे काँग्रेसने स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्यातील तक्रारी संपल्याचे दिसते. खातेवाटपाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य झाले आहे. येत्या लोकसभा निवडणुकाही हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार आहेत.कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पाठिंबा देण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे विधान उपमुख्यमंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांनी केले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराआधीच दोन्ही पक्षांत कुरबुरी सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. कुमारस्वामी यांनीही आपण काँग्रेसच्या दयेवर अवलंबून असल्याचे विधान त्यामुळे केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी मात्र कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचा पुढील पाच वर्षे पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे दोन महत्त्वाच्या खात्यांवरही एकमत झाले आहे. जनता दलाकडे अर्थ खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते असेल, असा निर्णय दोन्ही पक्षांनी मिळून घेतला. वादावादी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते मिळून किमान समान कार्यक्रम निश्चित करतील, असेही ठरले आहे.राज्य पातळीवर दोन पक्षांत एखाद्या निर्णयाबाबत मतभेद झाल्यास, त्याची जाहीर वाच्यता करण्याऐवजी दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी ते सोडवावेत, असेही दोघांत ठरले आहे. अर्थात हे सारे तोंडी स्वरूपात न ठेवता, त्याचा लेखी मसुदा तयार केला जाईल आणि कुमारस्वामी यांना पाच वर्षे पाठिंबा देत असल्याचा काँग्रेसचा निर्णयही लेखी स्वरूपात दिला जाईल, असे नक्की करण्यात आले आहे, असे जनता दलाचे सरचिटणीस दानिश अली यांनी स्पष्ट केले.दोन्ही पक्षांमध्ये खात्यांचे वाटपही कसे होणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या वाट्याला २२ मंत्रिपदे आली आहेत ज्यात गृह, जलसंपदा, आरोग्य, शेती, महिला आणि बालकल्याण आदींचा समावेश आहे. तर जनता दलाला मिळालेल्या १२ खात्यांमध्ये अर्थ, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पर्यटन, वाहतूक आदींचा समावेश आहे.