शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव आज भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:25 IST

पाकने दर्शविली तयारी : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर हालचाली

इस्लामाबाद : हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांची भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट घेऊ देण्याची तयारी पाकिस्तानने दर्शविली आहे.

कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती त्वरित न कळवून व जाधव यांना त्यांच्या देशाच्या वकिलातीच्या अधिकाºयांची भेट न घेऊ देऊन पाकिस्तानने जिनेव्हा कराराचा भंग केल्याचा निकाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता. अटकेतील परकीय नागरिकास वकिलातीच्या अधिकाºयांना भेटू देण्यास राजनैतिक भाषेत ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’ असे म्हटलेजाते. पाकिस्तानने जाधव यांना ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’ देऊन झालेल्या चुकीचे परिमार्जन करावे व त्यानंतर जाधव यांच्या शिक्षेचा ‘परिणामकारक’ फेरविचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता.

गेले दोन आठवडे पाकिस्तान आम्ही ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस’ देणार आहोत व त्याची तयारी सुरू आहे, असे सांगत होते. मात्र पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी गुरुवारी साप्ताहिक वार्तालापात सांगितले की, आता आमची तयारी झाली आहे. भारतीय वकिलातीचे अधिकारी जाधव यांना उद्या (शुक्रवारी) भेटू शकतात. काश्मीरचा तंटा सोडविण्यासाठी भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दर्शविली याचे फैजल यांनी स्वागत केले. मात्र यावर भारताने व्यक्त झालेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती, असे ते म्हणाले. त्यांचे म्हणणे होते की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाच्या चौकटीत चर्चा व्हावी ही पाकिस्तानची भूमिका आजही कायम आहे. भारताचा निर्णय अभ्यासानंतरच्पाकिस्तानने हा प्रस्ताव दिला असला तरी तो स्वीकारायचा की नाही, यावर भारताचा निर्णय संध्याकाळपर्यंत झालेला नव्हता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानने त्यांचा हा प्रस्ताव अधिकृतपणे आम्हाला कळविला आहे.च्हेग न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून त्याबाबतचा निर्णय राजनैतिक मार्गाने पाकिस्तानला कळविला जाईल. माध्यमांमधून याची याहून अधिक चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान