कुही
By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST
मुख्याध्यापकांची नियोजन सभा
कुही
मुख्याध्यापकांची नियोजन सभाशिक्षणाधिकाऱ्यांतर्फे आयोजन : नव्या शैक्षणिक सत्राची तयारीकुही : शालेय सत्र २०१५-१६ चे कामकाज नियोजनबद्ध पद्धतीने चालावे यासाठी शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे यांनी मुख्याध्यापकांची नियोजन सभा घेतली. त्यात शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेमार्फत जातपडताळणी, उत्पन्न आदी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी शाळा-शाळांमध्ये शिबिर घेणे, शाळांमध्ये माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करणे, शाळा डेटा बेसची माहिती, विद्यार्थी व शिक्षकांचे आधारकार्ड काढणे, मोफत पाठ्यपुस्तकाचे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करणे, परिवहन समिती स्थापन करणे, वेतनेतर अनुदान उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे, संच मान्यता, गुणवत्ता विकास आदी विषयांवर उपशिक्षणाधिकारी आर. डी. मुनघाटे, सतीश मेंढे, एम. एम. बारसकर, सुभाष मोझरकर यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक सत्रात सर्व सुविधा असाव्यात, पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना हसत-खेळत दर्जेदार शिक्षण द्यावे, शालेय पोषण आहाराचे वितरण करावे, गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांनी विशेषत्वाने लक्ष द्यावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी गुढे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागपूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)