शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोकीळ गुरूजी जलतरण तलाव घेतला ताब्यात

By admin | Updated: November 22, 2015 00:39 IST

जळगाव : मनपाचा कोकीळ गुरूजी जलतरण तलाव चालविण्यास मक्तेदाराने नकार दिल्यामुळे शनिवारी महापालिका प्रशासनाने तलावाचा पंचनामा करून ताब्यात घेतला आहे, अशी माहिती उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिली आहे. प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर याठिकाणी बाळकृष्ण काशिनाथ महाजन, अरविंद रतीलाल सपकाळे, सूर्यभान रायचंदे, महेश रायचंदे व महिला प्रशिक्षक ...


जळगाव : मनपाचा कोकीळ गुरूजी जलतरण तलाव चालविण्यास मक्तेदाराने नकार दिल्यामुळे शनिवारी महापालिका प्रशासनाने तलावाचा पंचनामा करून ताब्यात घेतला आहे, अशी माहिती उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिली आहे.
प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर याठिकाणी बाळकृष्ण काशिनाथ महाजन, अरविंद रतीलाल सपकाळे, सूर्यभान रायचंदे, महेश रायचंदे व महिला प्रशिक्षक मृणाल मधुकर कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलतरण तलाव चालविण्यासाठी मनपा प्रशासनाने मक्तेदाराला ठेका दिला होता. मात्र, जलतरण तलाव चालविणे अवघड असल्याचे सांगत ठेकेदाराने जलतरण तलाव चालविण्यास नकार असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने शनिवारी जलतरण तलावाची पाहणी केली. तेथे नादुरुस्त असलेले साहित्य व वस्तुस्थितीचा पंचनामा केला. त्यानंतर जलतरण तलावाचा ताबा घेतला आहे.
दुरुस्ती करून फी वाढ करणार
सद्य:स्थितीत जलतरण तलावाची प्रचंड दैना झाली आहे. आतील फरशा तुटल्या आहेत. शॉवर व जलशुद्धीकरणासाठी असलेल्या यंत्रणेतही बिघाड झाला आहे. ही परिस्थिती पंचनाम्यातून जाणून घेतल्यानंतर आता जलतरण तलावाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर सद्य:स्थितीत असणार्‍या फी पेक्षा दुपटीने फी घेण्याचा मनपा प्रशासन विचारधीन आहे. अजीवन सदस्यही रद्द करण्याचा प्रशासन विचारात आहे.
ठेकेदारावर कारवाईसाठी महासभेत प्रस्ताव
जलतरण तलाव चालविण्यासाठी ठेकेदाराने अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे त्याच्या विरूद्ध कार्यवाही करण्यासाठी महासभेत प्रशासनातर्फे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्याच वेळी जलतरण तलावाची फी व इतर धोरणात्मक निर्णयाबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.