शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे केरळमधील कोची विमानतळ बंद, मृतांची संख्या 45वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 11:39 IST

केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

कोची- केरळला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्यानं अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहेत. तर या पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. पेरियार नदीवरच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे कोची विमानतळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजेपर्यंत या विमानतळावरून कोणतंही विमान उड्डाण होणार नाही.मुन्नारमध्ये अतिवृष्टीमुळे एक इमारत कोसळली असून, त्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 मुलं या दुर्घटनेतून सुखरूप बचावली आहेत. तर गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसानं 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोची विमानतळ परिसरातही मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळेच आजपासून तो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रभावित झाली आहेत. पेरियार, इडुक्की आणि चेरुथोनी धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीनं हे विमानतळ बंद करण्यात आलं आहे.या पुरात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 55 हजारांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत. एर्नाकुलम, त्रिशूर आणि वयानड जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या भागात रेड अलर्टही जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील पोलीस, एनडीआरएफ, लष्कर आणि काही संघटनांकडून पूरग्रस्त भागातील लोकांची मदत करण्यात येत आहे. या नैसर्गिक संकटामुळे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Keralaकेरळfloodपूर