शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांसाठी 'रोटी बँक' चालवणाऱ्या किशोर कांत यांचं निधन; दोन दिवसांपूर्वी कोरोनाचं झालं होतं निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:03 IST

२०१७ मध्ये त्यांनी गरीबांसाठी 'रोटी बँक' सुरू केली होती.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये त्यांनी गरीबांसाठी 'रोटी बँक' सुरू केली होती.त्यांना वाराणसीतील रविंद्रपुरी येथे असलेल्या एका रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल.

वाराणसीत ‘रोटी बँक’ सुरू करून गरीबांचं पोट भरणारे सामाजिक कार्यकर्ते किशोरकांत तिवारी यांचं गुरूवारी निधन झालं. काही दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रविंद्रपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.किशोरकांत तिवारी हे मूळ बिहारमधील सासाराममचे रहिवासी होते. परंतु ते लंका सामनेघाट येथील महेश नगर कॉलनीमद्ये राहत होते. २०१७ मध्ये वाराणसीमध्ये त्यांनी रोटी बँक सुरू करून गरीबाचं पोट भरणं सुरू केलं. आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील लग्न कार्यात किंवा अन्य कोणत्या कार्यांमध्ये उरलेलं अन्य जमा करून शहरातील निरनिराळ्या भागात गरीबांना वाटत होते. काशीमध्ये कोणीही उपाशी राहू नये असा विचार करत त्यांनी लोकांच्या मदतीनं ताजं जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरही सुरू केलं होतं. रोटी बँकनं गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांना दोन वेळचं जेवण देऊन पोट भरलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपण चाचण्या केल्या असून टायफॉईड झाल्याचं सांगितलं होतं. तसंच लवकरच आपण ठीक होऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. गुरुवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

टॅग्स :foodअन्नBiharबिहारVaranasiवाराणसी