शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kirti Azad: Massive Hike in Petrol; इंधन दरवाढीनंतर PM मोदींचं जुनं ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:41 IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज भाववाढ झाली नसली तरी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेंड होत आहेत

नवी दिल्ली/मुंबई - गेल्या 10 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ आज झालीच नाही. त्यामुळे, गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीला काहीसा ब्रेक मिळाला आहे. मात्र, गेल्या 9 दिवसांत पेट्रोलच्या दरांत 5 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रति लीटर 116.72 रुपये आणि डिझेल प्रति लीटर 100.94 रुपये एवढे आहे. निवडणुकांच्या निकालानंतर 20 दिवसांनी दरवाढ झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियातूनही आपला राग व्यक्त होत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज भाववाढ झाली नसली तरी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेंड होत आहेत. ट्विटरवर #ThankYouModiji असा हॅशटॅग ट्रेंड होत असून अनेकांनी इंधन दरवाढीवरुन मिम्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी नरेंद्र मोदींचं जुनं ट्विट व्हायरल केलं आहे. या ट्विटमध्ये मोदींनी पेट्रोल दरवाढीवरुन युपीए-2 सरकारवर निशाणा साधला होता. आझाद यांनी मोदींचे ते 23 मे 2012 चे ट्विट शेअर करत, हे खरं आहे, असा उपरोधात्मक टोला लगावला आहे.    महिन्याचा पहिला दिवस असल्याने इंधन दर, गॅस सिलिंडर आदींच्या किंमतींच्या कमी-अधिक होण्याचा दिवस असतो. कंपन्यांनी याच दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर न वाढविल्याने पुढील महिन्यात दर कमी होणार की आणखी वाढत जाणार हे कळेनासे झाले आहे. दुसरीकडे कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मुंबईत आज कालच्या एवढेच पेट्रोल, डिझेलचे दर आहेत. पेट्रोल प्रति लीटर 116.72 रुपये आणि डिझेल प्रति लीटर 100.94 रुपये एवढे आहे. तर पुण्यात पेट्रोल 116.38 प्रती लीटर आणि डिझेल 99.12 रुपये प्रती लीटर आहे. पुण्यात १२ पैशांनी डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. 

सरकारने कमावले ३.३१ लाख कोटी

केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार, ऑईल डेपोपासूनच्या अंतरानुसार त्यांच्या किमती बदलतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेल