शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

तरुण लष्करी अधिकाऱ्याची काश्मिरात अपहरण करून हत्या

By admin | Updated: May 11, 2017 03:22 IST

सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू झालेले आणि काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनलेले तरुण लेफ्टनंट उमर फय्याज (२२) यांची अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली.

श्रीनगर : सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू झालेले आणि काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनलेले तरुण लेफ्टनंट उमर फय्याज (२२) यांची अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली. नातेवाईकाच्या लग्नासाठी ते सुट्टी घेऊन शोपियान जिल्ह्यात आले होते. त्यानंतर ही घटना घडली. त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर दूर त्यांचा मृतदेह आढळला. उमर यांच्या हत्येमुळे स्थानिक रहिवाशांत तीव्र संताप व्यक्त होत असून, मारेकऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. उमर फय्याज हे रजा घेऊन शोपियान जिल्ह्यात लग्न समारंभाला उपस्थित राहण्यास आले असताना, अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली. उमर हे सूरसोना (जि. कुलगाम) खेड्यातील श्रीनगर येथून ७४ किलोमीटरवरील बटापुरा येथे त्यांच्या मामेबहिणीच्या लग्नाला गेले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचे अतिरेक्यांनी अपहरण केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरेक्यांनी उमर यांच्या कुटुंबियांना धमकी दिल्यामुळे त्यांनी त्यांचे अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले नाही. गोळ्या घालून ठार मारल्याचा उमर यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून तीन किलोमीटरवरील हार्मेन भागात बुधवारी सकाळी आढळला. अपहरणकर्त्यांना उमर यांनी प्रतिकार केल्याचे शवविच्छेदन अहवालातून दिसते, असे अधिकारी म्हणाले. खूप जवळून त्याचे डोके, पोट किंवा छातीच्या भागात गोळ्या झाडण्यात आल्या. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार चेहरा झाकलेल्या दोघांनी त्याच्या घरात प्रवेश केला व उमर यांना ‘आमच्यासोबत चल’, असे म्हटले. त्यावेळी फय्याज नि:शस्त्र होते. फय्याजचे अपहरण झाले असले तरी त्याची सुटका होईल अशी आशा आम्हाला होती, त्यामुळे आम्ही अपहरणाची माहिती कोणालाही दिली नाही, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. या भागात पोलिसांबाबत तसे (अपहरणानंतर सुटका) घडले होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.उमर फय्याजचा संपूर्ण लष्करी सन्मानाने दफनविधी करण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेला अनेक लोक आले होते. यावेळीही काश्मिरी तरुणांनी जम्मू आणि पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी उमर यांना अखेरची सलामी दिल्यानंतर लगेच दगडफेकही सुरू झाली. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील १२९ व्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. दक्षिण काश्मीरमधील अशमुकुम येथील सरकारी नवोदय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते. फय्याज यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी मेजर जनरल बी. एस. राजू यांनी त्यांच्या सगळ्या शाखांना आदेश दिले आहेत. संपूर्ण लष्कर या कठीणप्रसंगी फय्याज यांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे लेफ्टनंट व राजपुताना रायफल्सचे कर्नल अभय कृष्ण म्हणाले. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी उमर फय्याजच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उमर फय्याज यांच्या हत्येचा निषेध केला आहे. संपूर्ण देश फय्याज यांचे कुटुंब, मित्र आणि सहकारी यांच्या दु:खात सहभागी आहे. माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत असल्याचे गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी फय्याज यांच्या हत्येचा निषेध केला. तेथील परिस्थिती खूपच वाईट आणि केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावी अशी आहे, असे ते म्हणाले.शिक्षा करण्याचा लष्कराचा निर्धार-तरुण काश्मिरी लेफ्टनंट उमर फय्याज यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा करण्याचा निर्धार बुधवारी लष्कराने केला. फय्याज यांच्या हत्येच्या घटनेने काश्मीर खोऱ्यात लोक दहशतवादाविरोधात निर्णायकरीत्या उभे राहतील, असे लेफ्टनंट अभय कृष्णा यांनी म्हटले. हे भ्याड कृत्य -उमर फय्याज यांचे अपरहण आणि हत्या हे भ्याड कृत्य आहे. उमर हे जम्मू आणि काश्मीरमधील आदर्श होते. काश्मीरमधील तरुणांना ते स्फूर्ती देतील. - अरुण जेटली, संरक्षणमंत्री