शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 07:06 IST

गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता.

दीमापूर :

गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीने एका मेजर रॅंकच्या अधिकाऱ्यासह ३० जवानांविराेधात आराेपपत्र दाखल केले आहे.

माेन जिल्ह्यातील  ओटिंग-तिरु भागात ४ डिसेंबर राेजी  ही घटना घडली हाेती. आसाम रायफल्सच्या २१ पॅरा स्पेशल फाेर्सच्या जवानांनी ही कारवाई केली हाेती. एसआयटीने दाखल केलेल्या आराेपपत्रात म्हटले आहे की, जवानांनी गाेळीबारादरम्यान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नव्हते. एसआयटीने गुवाहाटी, हैदराबाद आणि चंडीगड येथील फाॅरेन्सिक तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण पुरावे गाेळा केले. त्यानंतर एक मेजर, दाेन सुभेदार, ८ हवालदारांसह ३० जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मृतकांमधील बहुतांश जण काेळसा खाणीतील कर्मचारी हाेते. या घटनेनंतर ‘अफ्सपा’ कायदा हटविण्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतर आसाम,  मणिपूर आणि नागालॅंडमधील काही भाग या कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आला आहे. 

काय घडले हाेते त्या रात्री?प्रतिबंधित ‘एनएससीएन’ या संघटनेचे अतिरेकी तेथून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने माेहीम राबविली. पहाटे ४.२०च्या सुमारास तेथे आलेल्या एका पिकअप वाहनावर अतिरेकी असल्याच्या संशयावरून जवानांनी गाेळीबार केला. यावेळी वाहनात बसलेले ७ जण जागीच ठार झाले हाेते.  या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जवानांवर हल्ला केला. त्यावेळी जवानांनी केलेल्या गाेळीबारात आणखी ७ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान