खंडणीसाठी युवकाचे अपहरण साकुरी येथील घटना : ३० लाखाची केली मागणी
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
राहाता : ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी राहाता तालुक्यातील साकुरी येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली़ याबाबत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी गुन्ाची नोंद केली़
खंडणीसाठी युवकाचे अपहरण साकुरी येथील घटना : ३० लाखाची केली मागणी
राहाता : ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी राहाता तालुक्यातील साकुरी येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली़ याबाबत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली़ विठ्ठल तुकाराम लुटे (वय ६०, रा़ साकुरी) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मुलगा चंदन विठ्ठल लुटे (वय ३६) याचे नगर - मनमाड रोडवर साकुरी शिवारात युनायटेड स्टील नावाचे दुकान आहे़ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो दुकान बंद करुन घरी येत असताना नगर - मनमाड रोडवर साकुरी येथील एका हॉटेलजवळ काळ्या रंगाच्या इंडिगो कारमधून तीन ते चार अज्ञात इसमांनी चंदन याची दुचाकी अडविली व त्याला कारमधून पळवून नेल्याची घटना घडली़अपहरणकर्त्यांनी चंदन याच्या मोबाईलवरुन त्याचे वडील श्री. लुटे यांना फोन केला व मुलाच्या (चंदन) सुटकेसाठी ३० लाख रुपयाची खंडणी मागितली़ याप्ररकणी राहाता पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस उपअधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राहाता येथे भेट देऊन पोलीस निरीक्षक सुरेश बेंद्रे यांना पुढील तपासाबाबत सूचना दिल्या आहेत़