शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चंबळचं खोरं : ‘डाकूंचं अभयारण्य’ नव्हे, स्वातंत्र्यसैनिकांचं ‘जन्मस्थान’..

By admin | Updated: May 20, 2017 16:27 IST

1857च्या स्वातंत्र्यसमराला 160 वर्षे होत असल्याच्या निमित्तानं जगात सर्वाधिक काळ चाललेल्या जंगलातील स्वातंत्र्यलढय़ाचं एक जाज्वल्य स्मरण.

 - समीर मराठे

 
‘डाकूंचं अभयारण्य’ म्हणून आजही कुप्रसिद्ध असलेल्या उत्तरेतल्या चंबळच्या खोर्‍याची प्रतिमा तशी नकारात्मकच आहे, परंतु इतिहासात भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध मानल्या जाणार्‍या 1857च्या स्वातंत्र्यसमरात याच चंबळच्या खोर्‍यानं सर्वाधिक क्रांतिकारक या देशाला दिले आणि भारतभरात इंग्रजांनी क्रांतिकारकांची मुस्कटदाबी सुरू केली असताना याच चंबळच्या खोर्‍यातील क्रांतिकारकांनी इंग्रजांना कित्येक वर्षं सळो की पळो करुन त्यांच्या नाकात दम आणला होता हा इतिहास आहे. चंबळच्या याच खोर्‍यात 25 मे 1857ला शेकडो क्रांतिकारक एकत्र आले होते आणि त्यांनी स्वातंत्र्याची तुतारी फुंकली होती. या घटनेला 25 मे रोजी बरोबर 160 वर्षे होतील. त्यानिमित्त त्याच ठिकाणी, त्याच दिवशी आता एक वेगळी ‘जनसंसद’ बसणार आहे. चंबळच्या खोर्‍यातील समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे.
 
 
एक दशकापेक्षाही अधिक काळ ऐतिहासिक दस्तावेजांसाठी चित्रफिती तयार करण्याचं काम करणारे आणि चंबळ परिसरातील ऐतिहासिक जंगलांचं चित्रीकरण करण्यासाठी चंबळच्या खोर्‍यात सायकलवरुन तब्बल 2300 किलोमीटर प्रवास केलेले सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी या जनसंसदेचं आयोजन केलं आहे. 
चंबळच्या खोर्‍यात ‘पचनद’; पाच नद्यांचा संगम ज्या भागात होतो आणि जिथून गनिमी काव्यानं हजारो क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध ‘जंग’ सुरू केली होती त्याच ठिकाणी 25 मे पासून ही जनसंसद सुरू होणार आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील कार्यकर्ते, नागरिक या जनसंसदेला उपस्थित राहाणार आहेत. चंबळ खोर्‍याची ऐतिहासिक महती लोकांपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी आणि चंबळ खोर्‍याच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांमधून प्रत्येक विभागासाठी काही प्रतिनिधी (‘सांसद’) निवडले जाणार असून आपापाल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील. 
 
 
चंबळच्या खोर्‍यातलं जंगल आणि तिथल्या मातीच्या डोंगरांचा आधार नंतरच्या काळात जसा डाकूंनी घेतला तसाच आधार पूर्वी देशातल्या हजारो क्रांतिकारकांनी घेतला होता. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा तिन्ही राज्यांच्या सीमा या जंगलाला लागून आहेत. या भागातील हजारो घरांचे मागचे दरवाजे आजही ‘बिहड’मध्ये (जंगलात) उघडतात. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि मातीच्या डोंगरातील चक्रव्युहाच्या रचनेमुळे या भागात लपलेल्या लोकांना पुन्हा शोधून काढणं फारच मुश्कील. शिवाय या भागात पायीच फिरावं लागतं. घोडे वगैरे इथे चालू शकत नाहीत. याचाच फायदा घेत क्रांतिकारकांनी गनिमी काव्यानं स्वातंत्र्याची आपली लढाई अनेक वर्षे सुरू ठेवली होती. भारतात सगळ्या ठिकाणी इंग्रजांनी क्रांतीची केंद्रं उद्ध्वस्त केली, हजारो क्रांतिकारकांना काळ्या पाण्यावर पाठवलं, लाखो तरुणांना पकडून जेलमध्ये टाकलं, तर हजारोंची अक्षरश: कत्तल करून क्रांतिकारकांची चढाई मोडून काढली. चंबळच्या खोर्‍यात मात्र इंग्रजांनी हात टेकले. 1857ला सुरू झालेली ही लढाई इथले क्रांतिकारक तब्बल 1872पर्यंत लढत होते. 
 
 
सामाजिक कार्यकर्ते शाह आलम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलं, म्हणूनच चंबळच्या या घाटीला ‘नर्सरी ऑफ सोल्र्जस’ म्हटलं जातं. स्वातंत्र्याच्या लढाईसाठी इथल्या लक्षावधी तरुणांनी आपलं रक्त सांडलं आणि ही लढाई सुरू ठेवली. जगातलं सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन, लढाई म्हणूनही इथल्या लढय़ाची इतिहासात नोंद झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेतही सर्वाधिक तरुण याच चंबळच्या खोर्‍यातील होते हादेखील एक जिवंत आणि जाज्वल्य इतिहास आहे. हा इतिहास पुन्हा जिवंत करण्याचं, चंबळच्या खोर्‍याचं ऐतिहासिक महत्त्व आणि सत्य देशातल्या सगळ्याच लोकांना पुन्हा समजावून सांगण्यासाठी आणि त्याचबरोबर इथल्या गरीब, फाटक्या लोकांच्या समस्यांना हात घालण्यासाठी ही जनसंसद येथे सुरू करण्यात येत आहे.