शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण : कॅनडाच्या खासदाराने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 17:41 IST

भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जसपाल अटवाल याला कॅनडाचे खासदार रणदीप एस सराय यांनी निमंत्रण दिले होते. याबाबत खासदार रणदीप एस सराय यांनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्याचे कबूल करत याप्रकरणी माफी मागितली आहे. 

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यक्रमाला जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जसपाल अटवाल याला कॅनडाचे खासदार रणदीप एस सराय यांनी निमंत्रण दिले होते. याबाबत खासदार रणदीप एस सराय यांनी जसपाल अटवाल याला निमंत्रित केल्याचे कबूल करत याप्रकरणी माफी मागितली आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमाचे जसपाल अटवाल या खलिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रण गेल्याने एकच खळबळ उडाली. खलिस्तानी चळवळीशी संबंधित असलेल्यांना भेटण्यात आपल्याला अजिबात रस नाही असे जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या कार्यक्रमाला खलिस्तानी दहशतवादी उपस्थित राहिल्याने कॅनडा सरकारची मोठी पंचाईत झाली आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या ट्रुडो यांच्या कार्यक्रमाल जसपाल अटवाल उपस्थित होता. ट्रुडो  यांची पत्नी सोफी आणि कॅनडा सरकारमधील मंत्री अमरजीत सोही यांच्यासोबत त्याने काढलेला फोटोही प्रसिद्ध झाला आहे.

जस्टिन ट्रुडो यांच्या दौऱ्यात आणखी वाद उदभवू नये यासाठी कॅनडाचे राजदूत नादीर पटेल यांनी आज रात्री दिल्लीत होणाऱ्या डिनर कार्यक्रमाचे जसपाल अटवालचे निमंत्रण रद्द केले आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये पत्रकारांनी जस्टिन ट्रुडो यांना तुम्ही खलिस्तानी दहशतवाद्यांना का निमंत्रण दिले ? असा प्रश्न विचारला. त्यावर जस्टिन ट्रुडो यांनी उत्तर द्यायचे टाळले. जसपाल अटवाल फुटीरतावादी चळवळीमध्ये सहभागी होता. बंदी घातलेल्या शीख युथ फेडरेशनचा तो सदस्य आहे. 1986 साली कॅनडामध्ये पंजाब सरकारमधील मंत्री मलकीयत सिंग सिंधू यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणात जसपाल अटवालला न्यायालयाने दोषी ठरवून 20 वर्षाची शिक्षा सुनावली. कॅनडामध्ये झालेल्या हल्ल्यातून मलकीयत सिंधू बचावले होते पण नंतर पुढे भारतात त्यांची हत्या झाली.  

टॅग्स :Justin Trudeauजस्टीन ट्रुडो