शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केरळ सुदृढ, उत्तर प्रदेश मात्र आजारी; संपूर्ण देशाचा आरोग्य निर्देशांक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:38 IST

देशामध्ये केरळचा आरोग्य निर्देशांक सर्वाधिक असून, याबाबत मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे असे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालात म्हटले आहे. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत केरळ सुदृढ व उत्तर प्रदेश हे आजारी राज्य आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये केरळचा आरोग्य निर्देशांक सर्वाधिक असून, याबाबत मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे असे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालात म्हटले आहे. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत केरळ सुदृढ व उत्तर प्रदेश हे आजारी राज्य आहे.केरळमध्ये आरोग्य निर्देशांक ७६.५५ व उत्तर प्रदेशात ३३.६९ इतका आहे. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य निर्देशांकाची स्थिती गेल्या काही वर्षांत काहीशी सुधारली असली तरी यासंदर्भात मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत अजूनही हे राज्य शेवटच्या क्रमांकावरच आहे. आकाराने मोठ्या राज्यांमध्ये केरळनंतर पंजाब, तामिळनाडू व गुजरात या राज्यांचा आरोग्य निर्देशांक उत्तम आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, ओदिशा या राज्यांत मात्र आरोग्य निर्देशांकाची प्रकृती गंभीर अवस्थेत आहे. मोठ्या राज्यांमध्ये झारखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मिर येथील आरोग्य निर्देशांकामध्ये वृद्धी होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य निर्देशांकाची स्थिती नेमकी काय आहे याबाबत नीती आयोगाने प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही.देशातील छोट्या राज्यांपैकी मिझोरामचा आरोग्य निर्देशांक सर्वात चांगला असून त्यानंतर मणिपूर व गोवा या राज्यांचा क्रमांक लागतो. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, देशामध्ये विविध राज्यांत आरोग्यविषयक स्थिती कशी आहे याबाबत आरोग्य निर्देशांक अहवालातून माहिती मिळते. ज्या राज्यांत आरोग्यविषयक स्थिती उत्तम नाही ती सुधारण्यासाठी त्या राज्यांना इतर राज्यांनी मदत करण्याची प्रेरणाही अशा अहवालातून मिळते.तीन निकषांच्या आधारे झाले सर्वेक्षणआरोग्य निर्देशांकाठी मोठी राज्ये, छोटी राज्ये, केंद्रशासित प्रदेश असे तीन गट तयार करण्यात आले. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आरोग्यविषयक स्थिती, सरकारी यंत्रणांचा कारभार व आरोग्यविषयक माहिती अशा तीन निकषांच्या आधारे अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला. नीती आयोगाने केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालाला जागतिक बँकेचे सहकार्य लाभले आहे.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोग