शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

“‘वंदे भारत’मुळे अन्य ट्रेन खूप लेट होतात, दखल घ्या”; खासदाराचे अश्विनी वैष्णव यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:26 IST

Vande Bharat Express Train: वंदे भारत ट्रेनमुळे अन्य सेवांवर परिणाम होत असून, प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार अनेक ठिकाणाहून केली जात आहे.

Vande Bharat Express Train: भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जात असल्याचे दिसत आहे. आताच्या घडीला देशात ३४ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात असून, दिवाळीच्या दरम्यान आणखी ९ मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक सांभाळताना त्याच मार्गांवरील अन्य सेवांवर त्याचा परिणाम होत असून, ट्रेन लेट होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत एका खासदाराने थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये व्यथा मांडत तत्काळ दखल घेण्याचे आवाहन केले आहे. 

वंदे भारतचे वेळापत्रक बदलण्याची मागणी अनेक भागातून केली जात आहे. राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे इतर ट्रेनच्या वेळेवर परिणाम होत आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक बदलावे

रेल्वे मंत्रालयाने हस्तक्षेप करून वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी या खासदारांनी केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी उत्तर केरळमधील सेमी हायस्पीड ट्रेनमध्ये अनारक्षित डब्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. केरळमध्ये वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करणे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, परंतु इतर रेल्वे सेवांच्या वेळेवर आणि विश्वासार्हतेवर होणाऱ्या परिणामांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. तसेच ट्रेन सेवांच्या हॉल्टचा मुद्दा उपस्थित करत, दररोज प्रवास करणार्‍या आणि प्रवासासाठी सामान्य सेवांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या जीवनमानावर परिणाम होतो, असे खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

दरम्यान, असे दिसते की, अन्य ट्रेनचे अनियोजित हॉल्ट वंदे भारत ट्रेनचा वेग आणि वेळ साधण्यासाठी केले जात आहेत. यामुळे इतर रेल्वे सेवांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. उत्तर केरळमध्ये धावणाऱ्या ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे गैरसोयीची आणि असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी रेल्वे मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून आणखी अनारक्षित डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे. वंदे भारत ट्रेनच्या वेळा बदलाव्यात कराव्यात, जेणेकरून इतर सेवांवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव