शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? ऊर्जामंत्र्यांनी 30 महिन्यात 34 वेळा बदलले गाडीचे टायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 10:38 IST

आरटीआयमधून माहिती समोर आल्यानंतर ऊर्जामंत्री सोशल मीडियावर ट्रोल

थिरुअनंतपुरम: रस्त्यांवरचे खड्डे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा मनस्ताप कायम चर्चेचा विषय ठरतो. खड्ड्यांमुळे जीवाला धोका तर निर्माण होतोच. सोबत गाडीच्या दुरुस्तीचा खर्चदेखील वाढतो. अशाच रस्त्यांचा फटका केरळचे ऊर्जामंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम. एम. मणी यांना बसला आहे. मणी यांनी गेल्या 30 महिन्यांत 34 वेळा गाडीचे टायर बदलल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. कोच्चीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या धनराज एस. पिल्लई यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाला पर्यावरण मंत्रालयाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यानं उत्तर दिलं आहे. 'मी बऱ्याचदा सामाजिक प्रश्नांवर आरटीआय दाखल करत असतो. मात्र आता दाखल केलेल्या अर्जाचं उत्तर आल्यावर मला धक्काच बसला. मणी यांच्या दोन वर्ष जुन्या गाडीचे टायर इतक्यांदा बदलण्यात आले आहेत की त्याची सर्वसामान्य व्यक्ती कल्पनादेखील करू शकत नाही,' असं पिल्लई म्हणाले. पिल्लई यांनी आरटीआयमधून मिळालेलं उत्तर सोशल मीडियावर शेअर केलं. यानंतर नेटकऱ्यांनी ऊर्जामंत्री मणी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'ऊर्जामंत्र्यांची ऊर्जा' अशा शब्दांत अनेकांनी मणी यांची खिल्ली उडवली. त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. त्यामुळे जास्त ऊर्जा तर लागणार ना, मंत्री महोदय रबर उत्पादकांसाठी टायर-योजना चालवण्याचा प्रयत्न करताहेत, अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी मणी यांना लक्ष्य केलं. तर काहींनी यासाठी रस्त्यांच्या अवस्थेला जबाबदार धरलं. सोशल मीडियावर टायरचा मुद्दा पेटल्यावर एम. एम. मणी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं. 'मी डोंगराळ भागात राहतो. तिथे टायर लवकर खराब होतो. ट्रोल्सना टीका करायची असल्यास त्यांना आनंद घेऊ दे. मात्र या कालावधीत मी तब्बल 1,24,075 किलोमीटर प्रवास केला आहे. यातील बराचसा प्रवास इडुक्कीच्या डोंगराळ भागातून केला आहे. या परिस्थितीत टायर कमी काळ टिकतो, याची अनेकांना कल्पना आहे,' असं मणी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

टॅग्स :Keralaकेरळ