शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये महिलांनी खणल्या 190 विहीरी

By admin | Updated: July 10, 2017 10:33 IST

केरळमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तेथिल महिलांनी पुढाकार घेतला आहे

ऑनलाइन लोकमत

तिरूअनंतपूरम, दि. 10- देशातील अनेक लहान मोठ्या गावात अजूनही पाणी टंचाईचा सामना तेथिल लोकांना करावा लागतो. हंडाभऱ पाणी मिळावं यासाठी अनेक मैलांची पायपीटही करावी लागते. पाणी टंचाईच्या या समस्येवर मात करण्यासाठी अनेक पाऊलं सरकारकडून उचलली जातात पण विशेष म्हणजे गावातील स्थानिक नागरीक पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. केरळमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तेथिल महिलांनी पुढाकार घेतला आहे. पाण्याची चणचण बंद व्हावी यासाठी  केरळ मधील महिलांनी गावात चक्क 190 विहीरी खणल्या असल्याची माहिती समोर येते आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील गावात तब्बल ३०० महिलांनी एकत्र येऊन हातात कुदळ घेऊन विहीर खणायला सुरूवात केली. फक्त पुरूष मेहनतीची कामं करू शकतात ही मक्तेदारी मोडत महिलांनी मेहनतीचं काम करून सगळ्यांसमोर नवा आदर्श उभा केला आहे. महिलांच्या या कामगिरीचं तेथिल नागरीकांसह पंचायत समितीकडूनही कौतुक केलं जातं आहे. या गावात नेहमीच दुष्काळाची झळ तेथिल लोकांना सोसावी लागते. तसंच पाणी टंचाईचा सामनासुद्धा करावा लागतो.
 
पाणी मिळवण्यासाठी कितीतरी फूट खोल खड्ड्यात फक्त एका बांबूच्या साहाय्याने या महिलांना उतरावं लागलं होतं. अनेक अडचणींना सामोर जावं लागत असतानाही जिद्द न सोडता महिलांनी पाणी टंचाईवर मात केली. गावात पाणी नसल्याची ओरड न करता त्या महिलांनी कष्टाने पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नात त्यांना यश आलं.  
 
आणखी वाचा
 

कर्जमाफीचा लाभ ३६ लाख शेतकऱ्यांना

 

सुरक्षेच्या कारणाने व्हीआयपींची खासगी हेलिकॉप्टर सेवा स्थगित

‘मातोश्री’ची दानपेटी गुरुदक्षिणेच्या प्रतीक्षेत!

या 300 महिलांच्या समूहात ३५ पासून ते  ७० वर्षीय महिलांचा समावेश आहे. या समूहाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत हे काम केलं आहे. या गावात फक्त विहीर आणि तलाव हेच पाणी मिळविण्याचं साधन आहे. कोणत्याही प्रशिक्षण आणि मशीनरीशिवाय 10 ते 12 फूट खोल विहीरी खणण्याचं काम या महिलांनी केलं आहे.