शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

केरळ काँग्रेसचे कार्यालय विक्रीसाठी ओएलएक्सवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:56 IST

राज्यसभेची जागा पूर्वी राजकीय शत्रू असलेल्या पण आता मित्र बनलेल्या केरळ काँग्रेसला (मणी गट) ‘भेट’ दिल्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यालय ओएलएक्सवर ‘विक्री’साठी लावण्यात आले आहे.

थिरूवनंतपूरम - राज्यसभेची जागा पूर्वी राजकीय शत्रू असलेल्या पण आता मित्र बनलेल्या केरळ काँग्रेसला (मणी गट) ‘भेट’ दिल्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यालय ओएलएक्सवर ‘विक्री’साठी लावण्यात आले आहे.कोणा अनिश नावाच्या व्यक्तीने ओएलएक्स पोर्टलवर ही धाडसी जाहिरात टाकून येथील सस्थामंगलम भागातील इंदिरा भवनची किंमत त्याने दहा हजार रुपये सांगितली आहे.या जाहिरातीत या भवनचे छायाचित्र व त्याचा आकार देऊन लगेच तेथे जाता येईल, असेही म्हटले आहे. केरळमध्ये काँग्रेस मित्रपक्षांचे जे लांगूलचालन करीत आहे त्याला टोमणा मारताना जाहिरातीत इच्छूक लोक इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) किंवा केरळ काँग्रेसशी (मणी गट) संपर्क साधू शकतात, असेही म्हटले. राज्यसभेची जागा केरळ काँग्रेससाठी (मणी गट) सोडून देण्याचा निर्णय झाल्यापासून केरळ काँग्रेसमध्ये काही दिवसांत उघडपणे मतभेद व्यक्त होत आहेत.दोन वर्षांनंतर केरळ काँग्रेस (मणी गट) संयुक्त लोकशाही आघाडीत (यूडीएफ) परतला आहे. सध्या राज्यसभेतील ही जागा राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन यांच्याकडे असून ते १ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. केरळ काँग्रेसने (मणी गट) पक्षाचे माजी प्रमुख के. एम. मणी यांचा मुलगा जोस के. मणी यांना राज्यसभा उपसभापतिपदासाठी मैदानात उतरवले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKeralaकेरळ