तिरुवनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पक्षांतर्गत मतभेद टाळण्यास हा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेसने शनिवारी केला. संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला.
मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्षाची एक निश्चित कार्यपद्धती आहे आणि केरळमध्येही त्याच पद्धतीचे पालन केले जाईल असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले.
कोणाची आहे चर्चा?काँग्रेसचे खासदार के. सुधाकरन यांनी रमेश चेन्नीथला यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दर्शवला होता. तर एर्नाकुलम जिल्हा काँग्रेस समितीचे (डीसीसी) अध्यक्ष मोहम्मद शियास यांनी, व्ही. डी. सतीशन यांचे नाव न घेता, मुख्यमंत्री याच जिल्ह्यातून असावा, असे मत व्यक्त केले होते. शियास यांची भूमिका अप्रत्यक्षपणे सतीशन यांना पाठिंबा दर्शवणारी होती. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाल्यांनतर सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारची मते व्यक्त करणे योग्य नसल्याचे के. मुरलीधरन यांनी नमूद केले.
Web Summary : Congress avoids CM discussions before Kerala election results to prevent internal disputes. The party is confident of a UDF majority. Shashi Tharoor stated a standard procedure will be followed. Public endorsements for potential candidates caused some controversy, prompting calls for discretion until after the election.
Web Summary : कांग्रेस ने केरल चुनाव नतीजों से पहले मुख्यमंत्री पद पर चर्चा से परहेज किया ताकि आंतरिक विवादों से बचा जा सके। पार्टी को यूडीएफ बहुमत का भरोसा है। शशि थरूर ने कहा कि एक मानक प्रक्रिया का पालन किया जाएगा। संभावित उम्मीदवारों के लिए सार्वजनिक समर्थन से कुछ विवाद हुआ, जिसके बाद चुनाव के बाद तक विवेक बरतने का आह्वान किया गया।