केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून उमेदवारी अर्ज
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली मतदारसंघाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या अर्जामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे मैदान अधिकच भीषण झाले आहे. याआधी मंगळवारी ते वेळेवर पोहचू न शकल्याने त्यांना अर्ज भरता आला नव्हता. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास निवडणूक कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
केजरीवाल यांचा नवी दिल्लीतून उमेदवारी अर्ज
नवी दिल्ली-आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली मतदारसंघाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या अर्जामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे मैदान अधिकच भीषण झाले आहे. याआधी मंगळवारी ते वेळेवर पोहचू न शकल्याने त्यांना अर्ज भरता आला नव्हता. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास निवडणूक कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी, आमचा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध वा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. तो भ्रष्टाचार व महागाईिवरुद्ध असल्याचे म्हटले. मतदार पुढील पाच वर्षांकरिता आमच्या हाती सत्ता देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याआधी केजरीवालांनी किरण बेदी यांनी लाला लाजपत राय यांच्या प्रतिमेला भाजपाचे अंगवस्त्र अर्पण केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली. कमीतकमी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांना सोडून द्यावे, त्यांचे भगवीकरण करू नये, कोणताही स्वातंत्र्य संग्राम सैनिक कोणत्याही पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. आपण त्यांची विभागणी कुठल्या पक्षांमध्ये करू नये असे म्हटले.