शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 05:12 IST

दिल्लीत महाराष्ट्रासाेबतच निवडणुकीची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसांनी राजीनामा देत असल्याची घोषणा करून रविवारी दिल्लीकरांसह राजकीय क्षेत्रातील धुरिणांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि दिल्लीत मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी करेन’, असे त्यांनी जाहीर केले. ‘जोवर जनता प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. जेव्हा जनता सांगेल की, आम्ही प्रामाणिक आहोत, तेव्हाच मी मुख्यमंत्री व मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ,’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

येत्या काही दिवसांत आम आदमी पार्टीच्या आमदारांची बैठक होईल. त्यात  मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड केली जाणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दिल्लीत फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रासोबत नोव्हेंबरमध्येच दिल्लीतही निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अबकारी प्रकरणात अटक झाल्यानंतर सहा महिन्यांनी शुक्रवारी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दोनच दिवसांनी केजरीवाल यांनी राजीनाम्याचा नवा डाव टाकला. - आणखी वृत्त/७

लगेच का नाही : भाजप

nही एक भावनिक चाल आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली.

nन्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांऐवजी एखादे नामधारी मंत्री झाले आहेत. त्यामुळे हे राजीनाम्याचे नाटक सुरू आहे.

nभाजप नेते हरीश खुराणा यांनी राजीनाम्यासाठी ४८ तास कशाला हवेत, असा प्रश्न करून आजच त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे म्हटले.

शहीद भगतसिंग यांच्या पत्रांचा उल्लेख

केजरीवाल यांनी शहीद भगतसिंग यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केला. ते म्हणाले, मी तिहार तुरुंगातून नायब राज्यपालांना साधे पत्र लिहिले तर मला थेट इशारा देण्यात आला. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना सहकाऱ्यांना भेटण्याची परवानगी होती. मला मात्र तशी परवानगीही नव्हती.

आतिशींचे नाव चर्चेत

‘आप’मधून मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीच्या शिक्षण व अन्य प्रमुख खात्यांच्या मंत्री आतिशी मार्लेना यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज, मंत्री गोपाल राय, कैलाश गहलोत, कुलदीप कुमार आदींची नावांचीही चर्चा आहे.

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव चर्चेत असून, आमदारांच्या बैठकीतच यावर ठोस निर्णय होईल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप