शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल म्हणतात, निवडणूक आयोग धृतराष्ट्र तर भाजपा दुर्योधन

By admin | Updated: April 10, 2017 20:10 IST

मतदान यंत्रातील फेरफाराच्या मुद्याला पुन्हा हात घालताना केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना धृतराष्ट्राशी तर भाजपाची तुलना दुर्योधनाशी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 -  आप आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदी केजरीवाल यांनी मतदान यंत्रांवरून निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका करणे सुरूच ठेवले आहे. मतदान यंत्रातील  फेरफाराच्या मुद्याला पुन्हा हात घालताना केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची तुलना धृतराष्ट्राशी तर भाजपाची तुलना दुर्योधनाशी केली आहे. 
निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, "निवडणूक आयोगाने काहीही करून भाजपाला निवडणून देण्याचा विडा चलला आहे. मतदान यंत्रात गडबड असल्याची नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. पण त्याची चौकशी न करता निवडणूक आयोगाकडून शंकांना जन्म दिला जात आहे." गेल्या काही काळापासून केजरीवाल मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. पण निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात फेरफार होणे शक्य नसल्याचे सांगून केजरीवाल यांचे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. 
एमसीडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधिक केले. त्यावेळी केजरीवाल यांनी मतदान यंत्रात गडबड झाल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनला आहे आणि साम, दाम, दंड, भेद वापरून आपला पुत्र असलेल्या भाजपाला कोणत्याही किमतीवरी विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.काल देशभरात पोटनिवडणुका झाल्या. त्यात राजस्थानमधील धौलपूरमध्ये 18 मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे दिसून आले. इव्हीएमच्या प्रोग्रॅंमिंगमध्ये गडबड झाली आहे. मशिनीचे कोड बदलले. कुणी, कधी आणि का बदलले याबाबत शंका येत आहे." 
मतदारयंत्रातील फेरफारावरून गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर चौफेर आरोप करत असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे आव्हान निवडणूक आयोगाने स्वीकारले  होते. केजरीवाल यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे सिद्ध करून दाखवावेच, असे प्रतिआव्हान निवडणूक आयोगाने दिले होते.