शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

'अहंकार बाजूला ठेवून सर्वांचा विश्वास जिंकू या!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:30 IST

नवा समर्थ भारत उभारण्याचा संकल्प घेऊन पाच वर्षांपूर्वी एक ध्येयवादी वाटचाल आपण सुरू केली.

नवी दिल्ली : नवा समर्थ भारत उभारण्याचा संकल्प घेऊन पाच वर्षांपूर्वी एक ध्येयवादी वाटचाल आपण सुरू केली. देशाच्या जनतेने यास केवळ पसंतीच दिलेली नाही, तर नागरिक एक जनआंदोलन म्हणून यात सक्रियतेने सहभागी होण्यास उतावीळ आहेत, हाच नव्या जनादेशाचा अर्थ आहे. त्यामुळे अहंकाराला बिलकूल थारा न देता सेवाभावाने हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच पुढील पाच वर्षे काम केले जाईल, अशी ग्वाही देत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या पर्वाच्या वाटचालीतील पहिले पाऊल शनिवारी टाकले.लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) नेता व देशाचे भावी पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केल्यानंतर संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये मोदी बोलत होते. आघाडीतील सर्व सहकारी पक्षांचा व त्यांच्या नेत्यांचाही या यशात तेवढाच मोठा सहभाग आहे, असे सांगून मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले.मोदी म्हणाले, या जनादेशाने आपल्याला नवी ऊर्जा मिळाली आहे तशीच जबाबदीरीही खूप वाढली आहे. लोकांनी आपला सेवाभाव, परिश्रम व सचोटी यावर भरवसा ठेवून आपल्याला पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे हे यश आपले नसून जनतेने त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना अहंकाराला जराही थारा न देता माझ्यासह प्रत्येकाला एक कार्यकर्ता बनून पूर्ण समर्पणाने झोकून द्यावे लागेल.मोदी असेही म्हणाले की, आता देशाचे सरकार चालविताना आपल्याला ज्यांनी साथ दिली त्यांना व ज्यांनी विरोध केला अशा सर्वांना बरोबर जायचे आहे. आधी आपला ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा होता. आता आपल्याला याला ‘सबका विश्वास’ जोडायचे आहे. ही निवडणूक आपण जिंकलेली नसून मतदारांनी स्वत:हून आपली निवड केली आहे. मतदारांनी टाकलेला हा विश्वास म्हणजे आपल्याला जीवनऊर्जा देणारी गर्भनाळ आहे. ती कधीही तुटू न देण्याचे भान आपल्याला सदैव ठेवावे लागेल.भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले असले तरी संपूर्ण ‘एनडीए’ला बरोबर घेऊन जाणे हे केवळ राजकारण नाही. ती एक राष्ट्रीय गरज आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, प्रादेशिक अस्मिता व आकांक्षांना पूर्ण आदर देत राष्ट्रीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकपक्षीय शासनापेक्षा आघाडीचे सरकार हिच आदर्श व्यवस्था आहे, असेही मोदी म्हणाले.मोदी पुढे असेही म्हणाले की, आजवर समाजाला जात, पात, धर्म, पंथ याआधारे गटागटांमध्ये वाटून त्यानुसार राजकारण केले गेले. गरिबी आणि गरीब हेही राजकीय स्वार्थ साध्य करण्याचे एक साधन मानले गेले. आपल्याला या सर्वांवर मात करून काम करावे लागणार आहे. यासाठी आपल्याला बदलावे लागेल. सत्ताभावावर जसजशी मात कराल तसा सेवाभाव वाढत जाईल व सेवाभाव जेवढा दृढ होईल तेवढाच जनतेचा आशिर्वाद वाढत जाईल.मी गेली पाच वर्षे याच भावनेने काम केले.जनता जनार्दन ईश्वराचे रूप असते असे पूर्वी ऐकले होते. निवडणुकांच्या निमित्ताने याचा मला प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. म्हणूनच निवडणूक ही माझ्यासाठी एक तीर्थयात्रा होती, असेही मोदींनी सांगितले.>दलालांपासून सावध!प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना मोदींनी सांगितले की, दिल्लीत तुम्हाला न मागताही अनेक प्रकारची मदत करायला तत्परता दाखविणारे अनेक जण भेटतील. पण अशा दलालांपासून सावध राहा.सभागृहात किंवा माध्यमांशी बोलताना टीव्हीवर दिसेन म्हणून बोलण्याचा मोह टाळा. त्याने अडचणीत याल, असेही त्यांनी सावध केले.>मोदींनी भाषण सुरू करण्याआधी सभागृहात ठेवलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीला नमन केले. नंतर भाषणातही त्यांनी या संविधानाशी बांधिलकीचा वारंवार उल्लेख केला. व्यासपीठावर मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लालकृष्ण आडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ मार्गदर्शक नेत्यांना सन्मानाने स्थान देण्यात आले होते. नेतेपदी निवड झाल्यावर इतरांनी मोदी बसले होते त्या जागेवर येऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. पण मोदींनी जागेवरून उठून आडवाणी व जोशी यांच्यापाशी जात त्यांचे अभिनंदन विनम्रतेने स्वीकारले. भाषणाच्या आधी व मध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना उपस्थितांनी बाके वाजवून व ‘मोदी.. मोदी..’ असा घोशा लावून उत्स्फूर्तपणे साथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ने झाली. आजारी असलेल्या अरुण जेटली यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी