शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:09 IST

Kedarnath Helicopter Crash, Rajveer Singh Chauhan Funeral Video: राजवीर सिंह हे केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. राजवीर-दीपिका हे चार महिन्यांपूर्वीच जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले होते.

Kedarnath Helicopter Crash, Rajveer Singh Chauhan Funeral Video: केदारनाथ जवळ दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राजस्थानच्या जयपूर येथील माजी लष्करी अधिकारी राजवीर सिंह चौहान यांचा समावेश होता. ते या हेलिकॉप्टरचे पायलट होते. पायलट राजवीर सिंह चौहान हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. त्यांनी तब्बल १५ वर्षे १० महिने देशाची सेवा केली आणि लेफ्टनंट कर्नल पदावर असताना निवृत्त झाले. सैन्यात असताना त्यांनी बराच काळ फ्लाइंग ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केले होते. त्यांचा केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यावर आज राजस्थानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देताना पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान (wife Lt Colonel Deepika Chauhan emotional) यांच्या अश्रूंचा बांध फुटला. इतर कुटुंबीय, नातेवाईक आणि उपस्थित लोकही भावूक झाल्याचे दिसून आले.

अन् अश्रूंचा बांध फुटला...

राजस्थानच्या जयपूर शहरात निवृत्त लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंग चौहान वास्तव्यास होते. अपघातानंतर त्यांचे पार्थिव जयपूरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जयपूरच्या शास्त्री नगर परिसरातून त्यांची अंत्ययात्रा काढली गेली. यावेळी राजवीर यांची पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी हातात राजवीर यांचा फोटो घेतला होता. त्या अंत्ययात्रेत सर्वात पुढे चालत होत्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सारेच गहिरवले.

----

चार महिन्यांपूर्वीच झाले होते जुळ्या मुलांचे वडील

रविवारी सकाळी राजवीर सिंह चौहान यांचे बेल ४०७ हेलिकॉप्टर उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ अपघातग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन चौहान यांच्यासह सहा भाविक होते. दुर्दैवाने, या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला. राजवीर सिंह चौहान हे मूळचे राजस्थानचे होते. चौहान २००९ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले आणि तिथे लेफ्टनंट कर्नल झाले. चौहान यांनी २००७ मध्ये राजस्थान विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए पदवी प्राप्त केली. राजवीर सिंह चार महिन्यांपूर्वीच जुळ्या मुलांचे वडील झाले.

टॅग्स :KedarnathकेदारनाथHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाIndian Armyभारतीय जवान