शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

भाजपाचे मंत्री म्हणाले, कथुआ बलात्कार क्षुल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 05:46 IST

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, भाजपाचे नेते कविंदर गुप्ता यांनी कथुआ बलात्काराची घटना क्षुल्लक होती

जम्मू : मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, भाजपाचे नेते कविंदर गुप्ता यांनी कथुआ बलात्काराची घटना क्षुल्लक होती, तिला महत्त्व देता कामा नये, असे धक्कादायक विधान केले. एवढेच नव्हे, तर कथुआ बलात्कारात सहभागी आरोपींच्या समर्थनार्थ झालेल्या मेळाव्यात सहभागी झालेले स्थानिक आमदार राजीव जसरोटिया यांनाही फेरबदलात भाजपाने मंत्री केले आहे.नव्या उपमुख्यमंत्र्यांचे कथुआविषयीचे वक्तव्य व आरोपींची तरफदारी करणाऱ्या आमदाराला मंत्री करणे यामुळे भाजपा नेतृत्व देशाला हादरवून टाकणाºया घटनेकडे कसे पाहत आहे, हेच स्पष्ट होत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यावर आपण कथुआचे समर्थन करीत नसून, अशा घटना घडत असतात, असे आपणास म्हणायचे होते, अशी सारवासारव गुप्ता यांनी केली. या आधी केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी कथुआ ही किरकोळ घटना असल्याचे विधान केले होते. या आधी आरोपींच्या समर्थनाच्या मेळाव्यास सहभागी झालेल्या दोन मंत्र्यांना भाजपाने राजीनामा देण्यास सांगितले होते.कथुआ बलात्काराचे समर्थन हेत्यांच्या राजीनाम्याचे कारण नसल्याचेआज उघड झाले, असेही काँग्रेसने म्हटले आहे. उपमुख्यमंत्री असलेले निर्मलसिंह मवाळ आहेत आणि ते मुफ्ती यांना दबून असतात, अशी भावना भाजपामध्ये बळावत होती. नवे मंत्री आक्रमक असतील, हे भाजपाने पाहिले आहे. भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीही मंत्रिमंडळ फेरबदलाशी कथुआचा संबंध नसल्याचे जाहीर केले. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे नवे चेहरे सरकारमध्ये आणले, असे ते म्हणाले.जम्मूमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतपाल शर्मा व सांबातील देविंदर कुमारमन्याल यांना मंत्री करताना राज्यमंत्रीसुनील शर्मा यांना कॅबिनेट मंत्रिपदीबढती दिली आहे. पीडीपीचे मोहम्मद खलील बंड व मोहम्मद अशरश मीर यांचाही मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.पंतप्रधान मोदींच्यातंबीनंतरही भाजपाचे वाचाळवीर सुसाट...वादग्रस्त विधाने करून माध्यमांना मसाला पुरवू नका. जे काही बोलणार ते विचार करून बोला, अशी तंबी दिल्यानंतरही भाजपातील वाचाळवीर नेते सुसाट सुटले आहेत. बलात्काराच्या घटनांवर भाजपाचे नेत्यांची विवेकशून्य विधाने सुरूच आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाण्याची शक्यता आहे. येत्या कर्नाटक निवडणुकीत अशा वाचाळवीरांच्या वादग्रस्त विधानांचा मोठा फटका भाजपाला सहन करावा लागू शकतो.पंतप्रधान म्हणाले होते...अशा घटनांमुळे मान शरमेने खाली जाते, पण बलात्काराचे राजकारण करू नका.राष्ट्रपती म्हणाले होते...कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; या घटनेची शरम वाटते.निर्मल सिंह विधानसभाध्यक्षकविंदर गुप्ता हे आतापर्यंत विधानसभाध्यक्ष होते. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, कालपर्यंत उपमुख्यमंत्री असलेल्या निर्मल सिंह यांना विधानसभाध्यक्षपद दिले जाणार आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. निर्मलसिंह यांनी कालच उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.कथुआच्या घटनेमुळे दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. मात्र, त्या बदल्यात याच प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठीच्या रॅलीत सहभागी असणाºयाला मंत्री केले गेले. भाजपा आणि मेहबुबा मुफ्ती कथुआ प्रकरणी नेमकी संभ्रमात का आहे?- ओमर अब्दुल्ला, नॅशलन कॉन्फरन्स

टॅग्स :BJPभाजपाKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण