शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कथुआ बलात्कार : सात जणांवर आरोप निश्चित; १५ पानी आरोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:46 IST

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिचा खून केल्याच्या खटल्यात पठाणकोट जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आठपैकी सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आठवा आरोपी अल्पवयीन आहे.

पठाणकोट : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात भटक्या जमातीमधील आठ वर्षाच्या मुलीला मंदिरात कोंडून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून, तिचा खून केल्याच्या खटल्यात पठाणकोट जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आठपैकी सात आरोपींवर आरोप निश्चित केले. आठवा आरोपी अल्पवयीन आहे.कथुआचे माजी महसुली अधिकारी संजीराम, विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया व सुरिंदर कुमार, संजी राम यांचा मुलगा विशाल जनगोत्रा व प्रवेश कुमार यांच्यावर खटला चालणार आहे. खटल्यातील महत्वाचे पुरावे नष्ट केल्याबद्दल पोलीस उप निरीक्षक आनंद दत्ता व जमादार तिलक राज यांनाही आरोपी करण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपी संजी राम याचा पुतण्या आहे.काश्मीरमध्ये हा खटला निष्पक्षतेने चालणार नाही, अशी शंका पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याने सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे रोजी हा खटला पठाणकोट न्यायालयात वर्ग केला. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावरसात दिवस रोजच्या रोज ‘इन कॅमेरा’ सुनवणी झाल्यानंतर न्यायालयाने खटला चालविण्यासाठी सात आरोपींवर आरोप निश्चितकेले. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास खटल्यातून वगळण्यात आले. (वृत्तसंस्था)काय आहेत आरोप?जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी १५ पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार गेल्या १० जानेवारीस या मुलीचे अपहरण केले गेले व एका छोट्या मंदिरात डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केले गेले. चार दिवस गुंगीच्या औषधांनी बेशुद्ध ठेवल्यानंतर दगडाने डोके ठेचून तिचा खून केला गेला. निश्चित केलेल्या आरोपांत कट कारस्थान करणे, खून, बलात्कार व पुरावे नष्ट करण्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण