शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उपनिरीक्षकपदासाठी काश्मिरी तरुणाईची श्रीनगरमध्ये झुंबड

By admin | Updated: May 15, 2017 00:10 IST

विविध दहशतवादी संघटनांच्या धमकीची पर्वा न करता जम्मू-काश्मीर खोऱ्यातील तरुण सुरक्षा दलात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे ६९८ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी

श्रीनगर : विविध दहशतवादी संघटनांच्या धमकीची पर्वा न करता जम्मू-काश्मीर खोऱ्यातील तरुण सुरक्षा दलात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे ६९८ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसते. पोलीस उप-निरीक्षकपदासाठी ६७ हजार २१८ उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी जवळपास २ हजार तरुण आणि युवतींनी बक्षी स्टेडियमवर शारीरिक चाचणीसाठी हजेरी लावली होती.भारतीय लष्करातील तरुण अधिकारी लेफ्ट. उमर फैयाज यांचे अपहरण करून हिजबूल मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी त्यांची हत्या करण्यात आल्याची संतप्त घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा देशभर निषेध करण्यात आला.दुसरीकडे, दहशतवादी संघटनांना काश्मीरमधील तरुणांना सुरक्षा दलात सामील होऊ नये म्हणून सातत्याने व्हिडिओ जारी करून धमक्या देत आहेत. या धमक्यांची पर्वा न करता काश्मीरमधील तरुणांनी मोठ्या संख्येने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी अर्ज दाखल करून दहशतवाद्यांना तडाखेबाज उत्तर दिले आहे. यापैकी ३५ हजार ७२२ तरुण काश्मीरमधील असून ३१ हजार ४९६ तरुण जम्मू विभागातील आहेत.विशेष म्हणजे ६ हजारांहून अधिक काश्मिरी तरुणी हिंमत दाखवून या पदासाठी शारीरिक चाचणीसाठी आल्या. रूढीवादी समाजाची सर्व बंधने तोडून काश्मीर तरुणी या भरती मोहिमेत सहभागी झाल्या, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस संचालक एस. पी. वैद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)उपनिरीक्षकपदासाठी इच्छुक असलेली नुसरत जान ही श्रीनगर येथील आहे. ती म्हणाली की, स्थानिक महिलांना मदत करण्याची माझी इच्छा आहे. अतिरेकी कारवायांमुळे काश्मीर खोऱ्यातील महिलांना खूपच त्रास सोसावा लागतो. या त्रासातून त्यांची सुटका करणे जरुरी आहे, असे मोठ्या धाडसाने सांगत तिने सुरक्षा दलात काम करण्याचा ठाम इरादा व्यक्त केला.पोलीस सेवेत दाखल होऊन दहशतवादामुळे समाजाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाचा मुकाबला करण्यात मला मदत होईल, असे परखड मत रुबीना अख्तर या तरुणीने व्यक्त केले. मला पोलीस सेवेत काम करण्याची संधी मिळाली तर मी नशीबवान ठरेल, असे फर्जाना हिने म्हटले आहे.विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला रफिक भट म्हणाला की, काश्मीर खोऱ्यातील पोलीस सातत्याने दहशतवाद्यांच्या धोक्याखाली वावरत असतात. याची जाणीव असूनही माझी या संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे. अतिरेक्यांचा मार्ग योग्य नाही. या रोगावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे.