शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी तरुणच कारणीभूत!

By admin | Updated: March 31, 2017 01:24 IST

सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या

श्रीनगर : सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यासाठी चकमकीच्या ठिकाणी जाणारे युवक एकाप्रकारे स्वत:च्या आत्महत्येला कारणीभूतच ठरत आहेत, त्यांनी या प्रकारापासून दूर राहावे, असे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी केले आहे. चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस बुलेटप्रूफ वाहन किंवा घराचा आडोसा घेतात. अशा ठिकाणी युवकांनी जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे, असे सांगून ते म्हणाले की, राजकीय लाभासाठी खोऱ्यातील शांततेला बाधा पोहोचवू पाहणारे घटक दिशाभूल करून आपला वापर करीत आहेत हे युवकांनी समजून घेण्याची गरज आहे. आपण कोणाला लागू हे गोळीला माहीत नसते. त्यामुळे माझे सर्व तरुण मुलांना आवाहन आहे की, त्यांनी चकमकीच्या ठिकाणी न येता आपल्या घरातच थांबावे.दहशतवाद्यांना पळून जाता यावे यासाठी तरुणांना दगडफेकीसाठी चिथावले जाते. यासाठी समाजकंटक सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. आमचा देश व खोऱ्यातील शांततेच्या शत्रूंकडून सोशल मीडियाचा होत असलेला हा दुरुपयोग आहे, असेही ते म्हणाले. तरुणांना चिथावण्यासाठी हे लोक जवळपास ३०० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स सक्रिय करतात. हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि सोशल साइट्स निगराणीखाली असून, संबंधितांवर कारवाई केली जाईल. यातील काही अकाउंट सीमेपलीकडील असल्याचे चौकशीत आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.आयएसआयचा प्रयत्नपाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय काश्मीर खोऱ्यातील निरपराध तरुणांना घराबाहेर पडून चकमकीच्या ठिकाणी जाण्यासाठी चिथावत आहे, असेही वेद म्हणाले. वेद यांनी मंगळवारच्या हिंसाचारानंतर पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांची भेट घेऊन काश्मिरातील विद्यमान परिस्थितीवर विस्ताराने चर्चा केली. खोऱ्यात कुठेही चकमक सुरू होताच. पाकिस्तानी गुप्तचर सक्रिय होतात, असेही ते म्हणाले.केंद्र सरकारने चर्चेची प्रक्रिया सुरू करावीकाश्मिरातील परिस्थिती कठीण असून, केंद्राने सर्व पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करायला हवी, असे एका शीख संघटनेने गुरुवारी म्हटले. निदर्शकांवरील कठोर कारवाईमुळे युवक मुख्य प्रवाहापासून आणखी दुरावतील, असेही संघटनेने म्हटले आहे. आॅल पार्टीज् शीख को-आॅर्डिनेशन समितीचे (एपीएससीसी) अध्यक्ष जगमोहनसिंग रैना म्हणाले की, काश्मिरात सध्या खूपच वाईट परिस्थिती आहे.केंद्र सरकार परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व संबंधित पक्षकारांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करील, अशी आम्हाला आशा आहे. निदर्शकांवर कठोर कारवाईतून काहीही साध्य होणार नाही. उलट यामुळे तरुणवर्ग मुख्य प्रवाहापासून दुरावेल.