शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kashmir: काश्मीर पाकिस्तानला द्यावे का ? स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये अजब प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:08 IST

Kashmir Issue: मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) पूर्व परीक्षेत काश्मीरबाबत विचारलेला वादग्रस्त प्रश्न व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (एमपीपीएससी) पूर्व परीक्षेत काश्मीरबाबत विचारलेला वादग्रस्त प्रश्न व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काश्मीर पाकिस्तानला देण्याचा निर्णय भारताने घ्यावा का, असा प्रश्न रविवारच्या परीक्षेत विचारल्याचे समोर आले आहे. या वादग्रस्त प्रश्नावरून राजकीय गदारोळही सुरू झाला आहे. १९ जून रोजी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाली. या परीक्षेत काश्मीर पाकिस्तानला देण्याचा निर्णय भारताने घ्यावा का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात पर्याय म्हणून युक्तिवाद  १ दिला होता की, होय, यामुळे भारताचे खूप पैसे वाचतील. युक्तिवाद २ होता- नाही, अशा निर्णयामुळे आणखी समान मागण्या होतील. या प्रश्नामुळे   विद्यार्थी संभ्रमात पडले होते.

नेटकरीही संतापलेया प्रश्नाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काश्मीर देशाच्या अभिमान आहे. काश्मीर पाकच्या ताब्यात देण्याचा विचारही आक्षेपार्ह आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेता अजय यादव यांनी दिली. अन्य विरोधकही यामुळे संतप्त आहेत. नेटकरीही एमपीपीएससीच्या परीक्षेत विचारलेल्या अशा प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. 

 प्रश्नपत्रिका तयार करणारे काळ्या यादीतहा वादग्रस्त प्रश्न व्हायरल झाल्यानंतर गदारोळ झाला. वाढता वाद पाहून मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने प्रश्न आक्षेपार्ह असल्याचे मान्य करीत संबंधित प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या दोन व्यक्तींना नोटीस पाठवून काळ्या यादीत टाकले आहे. यासोबतच प्रश्न तयार करताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही. हे गैरवर्तनाच्या श्रेणीत येते, असेही नमूद केले. आयोगाच्या परीक्षा पद्धतीतून दोघांनाही कायमचे वगळण्यात आले आहे. दोन्ही व्यक्तींच्या विभागांना त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पत्रदेखील लिहिण्यात आले आहे. मात्र, भरती परीक्षेतील गोपनीयतेचे कारण देत वादग्रस्त प्रश्नपत्रिकेचे सेटर्स आणि मॉडरेटर यांची नावे उघड करण्यात आली नाहीत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरexamपरीक्षा