शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात पुन्हा संघर्ष, युवक ठार

By admin | Updated: July 23, 2016 05:29 IST

काश्मीरमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शक आणि सुरक्षा दलांत उडालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला.

श्रीनगर : काश्मीरमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर निदर्शक आणि सुरक्षा दलांत उडालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे खोऱ्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारातील बळींची संख्या वाढून ४५ झाली आहे. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह शनिवारी श्रीनगरला येत आहेत. परिस्थिती शांत असली तरी संचारबंदी लागू असलेल्या खोऱ्यात विशेष करून बारामुला, कुपवाडा आणि पुलवामा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. कायदा व सुव्यवस्था आणखी बिघडण्याच्या भीतीमुळे खोऱ्यातील दहा जिल्ह्यांत संचारबंदी लागू आहे.शुक्रवारच्या नमाजनंतर पुलवामाच्या अवंतीपोरा भागातील चुरसू येथील निदर्शनादरम्यान मुश्ताक अहमद भट्ट हा युवक पेलेट गनचा छर्रा लागून गंभीर जखमी झाला. त्याला एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, त्याचा मृत्यू झाला. एसएमएचएस रुग्णालयात आज आणखी दोन जखमींना दाखल करण्यात आले. यातील एक जण पुलवामाच्या काकापुरा येथे आणि दुसरा बाराबुला येथील सोपोर भागात जखमी झाला. काकापुरा येथील संघर्षात जखमी झालेल्या आसीफची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागातील संघर्षात जखमी झालेल्या इश्तियाक अहमद याचा सुरा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या ८ जुलै रोजी हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वनी याचा चकमकीत मृत्यू झाल्यापासून खोऱ्यात सुरक्षा दले आणि निदर्शकांत चकमकी सुरू आहेत. (वृत्तसंस्था)>केंद्र स्तरावरून पहिल्यांदाच उच्चस्तरीय दौराजम्मू-काश्मीरचे पीडीपी-भाजप सरकार परिस्थिती काबूत आणण्यासाठी संघर्ष करीत आहे. खोऱ्यात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राजनाथसिंह दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर येणार असून, श्रीनगरमध्ये ते लोकांशी चर्चा करतील. गेल्या ८ जुलै रोजी हिंसाचार उफाळल्यापासून केंद्र स्तरावरून पहिल्यांदाच उच्चस्तरीय दौरा होत आहे.