शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पाच वर्षांत ९६३ दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:56 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत ९६३ दहशतवादी ठार, तर ४१३ सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेमध्ये मंगळवारी दिली.२०१४च्या सुरुवातीपासून ते जून २०१९पर्यंतची ही आकडेवारी आहे. जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, दहशतवाद कदापिही खपवून घेतला जाणार नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सीमेपलीकडून भारतात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न होत असतात.ते म्हणाले की, घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने बहुस्तरीय धोरणाची अंमलबजावणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये विकासाची कामे हाती घेणे, कुंपण उभारणे, सुरक्षा जवानांना अत्याधुनिक शस्त्रे देणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे असे अनेक उपाय योजण्यात आले असून त्याचे योग्य परिणामही दिसत आहेत.> ४०० दहशतवाद्यांची घुसखोरीगृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत सुमारे ४०० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. त्यातील १२६ दहशतवादी सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झाले. या काळात २७ सुरक्षा जवान शहीद झाले तर चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले.काश्मीरमध्ये २०१८च्या तुलनेत यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्के कमी करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. २०१८ साली दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या १४३ घटना घडल्या होत्या. २०१६ साली हेच प्रमाण ११९ व २०१७ साली १३६ इतके होते.

टॅग्स :terroristदहशतवादी