शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक सदानंद गौडापासून मला दिवस गेले - कन्नड मॉडेल

By admin | Updated: August 28, 2014 17:41 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडाविरोधात एका मॉ़डेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून कार्तिकपासून दिवस गेल्याचे तिने सांगितले.

ऑनलाइन लोकमत

बंगळुरु, दि. २८ - केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा याच्याशी आपण गुप्तपणे लग्न केले असून त्याच्यापासून आपल्याला दिवस गेले असल्याचा आरोप दक्षिण भारतातल्या एका मॉडेलने केला आहे. कार्तिकच्या घरच्यांनी आपल्याला सून म्हणून स्वीकारावे अशी मागणी तिने केली आहे.

आपल्याला लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात रस नव्हता, परंतु कार्तिकची तशी इच्छा होती असे सांगताना आपले त्याच्याशी लग्न झाल्याचा दावा या मॉडेलने केला आहे. तर आपला या मॉडेलशी लैंगक संबंध आला नव्हता असा दावा कार्तिक गौडाने केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेल्या सदानंद गौडा यांच्या मुलावर असे आरोप झाल्याने खळबळ माजली आहे.

याआधी काल रात्री या प्रकरणाची वाच्यता झाली होती. आज सकाळी एका मॉडेलने कार्तिक विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केल्याचे समोर आले. लग्नाचे आमीष दाखवत कार्तिक गौडा यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप पिडीत मॉडेलने केला.

दक्षिण भारतातील सिनेसृष्टीतील अभिनेत्री व मॉडेलने बंगळुरुतील आर टी नगर पोलिस ठाण्यात कार्तिक गौडा यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. एका मित्राद्वारे पिडीत अभिनेत्रीची सहा महिन्यांपूर्वी कार्तिक गौडाशी ओळख झाली होती. काही दिवसांचे ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले.कार्तिक गौडा यांच्या आई व वडिलांनाही आमच्या प्रेमसंबंधांची माहिती होती असे या पिडीत मॉडेलने तक्रारीत म्हटले. कार्तिक यांच्या आईने आमच्या प्रेमसंबंधांना विरोध दर्शवला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे.  आईवडिलांच्या विरोधानंतरही मी तुझ्याशीच लग्न करीन असे सांगत कार्तिक गौडा यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोपही पिडीतेेने केला आहे.  पोलिसांनी कार्तिक गौडा यांच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६), फसवणूक (कलम ४२०) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत अभिनेत्रीच्या आईनेही मुलीचे कार्तिक गौडाशी प्रेमसंबंध असल्याची मान्य केल्याचे समजते. तर रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे असा दावा केला आहे. कार्तिक गौडा यांनीदेखील पिडीत मॉडेलचे आरोप फेटाळून लावले आहे. तर लवकरच कार्तिक यांच्यासोबत झालेल्या विवाहाची व्हिडीओ सीडी जाहीर करुन जगासमोर पुरावा सादर करु असे पिडीत अभिनेत्रीने प्रसारमाध्यांना सांगितले.