बंगळुरू : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुुलगा कार्तिकच्या बाळाची आई होणार असल्याचा दावा त्या अभिनेत्रीने केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. याच अभिनेत्रीच्या तक्रारीवरून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा याच्या विरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, आपल्या मुलावरील सर्व आरोप रेल्वेमंत्री गौडा यांनी फेटाळून लावले आहेत.कार्तिक आणि आपण मे महिन्यापासून एकमेकांना ओळखत असून जूनमध्ये त्याने आपल्याशी विवाह केला़ लग्नाच्या वेळी कोण-कोण होते, असे विचारले असता तिने सांगितले की, त्यावेळी फक्त कार्तिकचा कारचालक उपस्थित होता. कार्तिकने माझ्याशी बळजोरीने लग्न केले. मंगळसूत्रही घालून मी सांगेल ते ऐकावे लागेल, असे म्हणत त्याने माझ्याशी जबरदस्ती केली. पुराव्यादाखल कार्तिक आणि तिची काही छायाचित्रेही तिने पोलिसांना दिली आहेत़ काल बुधवारी कार्तिकचा अन्य एका तरुणीशी साखरपुडा पार पडला़ त्याच रात्री कथितरीत्या पीडित मॉडेलने त्याच्याविरुद्ध आर. टी़ पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ कार्तिक आपला पती असल्याचा दावा करीत या मॉडेलने गुरुवारी पत्रपरिषद घेऊन आपबीती सांगितली़ (वृत्तसंस्था)
कार्तिक गौडाच्या बाळाची आई होणार
By admin | Updated: August 30, 2014 03:06 IST