नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना विदेशात जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मे आणि जूनमध्ये विदेशात जाण्याआधी कार्ती चिदम्बरम यांनी न्यायालयात १० कोटी रुपये हमी म्हणून जमा करावेत, अशी अट न्यायालयाने घातली आहे.आयएनएक्स मीडिया आणि एअरसेल मॅक्सिस प्रकरणात कार्ती यांच्या विरुद्ध चौकशी सुरू आहे. टोटस टेनिस लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी अमेरिका, जर्मनी आणि स्पेन या देशांत जाण्याची परवानगी त्यांनी न्यायालयाकडे मागितली होती.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने त्यांना या विदेश दौऱ्यासाठी परवानगी दिली. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने काम पाहणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कार्ती यांच्या दौºयाला विरोध केला नाही, हे विशेष.
कार्ती चिदम्बरम यांना विदेशी जाण्याची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 04:45 IST