शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कर्नाटक : म्हैसूरमध्ये रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या वाहनाकडे फेकला मोबाईल, पोलिसांनी सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 21:35 IST

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान मोबाईल फेकल्याची घटना समोर आली आहे.

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान मोबाईल फेकल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक प्रचारानिमित्त पंतप्रधान रविवारी म्हैसूरमध्ये आले होते. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पंतप्रधान हात दाखवत समर्थकांना अभिवादन करत आहेत, तेव्हा मागून उडणारा एक मोबाइल त्यांच्या समोर येतो. 

पंतप्रधानांच्या ताफ्याच्या वाहनावर हा मोबाईल पडल्याचं सांगण्यात येत आहे. एक महिला पंतप्रधानांचा व्हिडीओ बनवत असताना चुकून तिचा मोबाईल पडला. खास बनवलेल्या वाहनाच्या बोनेटवर तो मोबाईल पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्साहाच्या भरात त्यांच्या हातून हा फोन फेकला गेला. हा फोन भाजपच्याच एका महिला कार्यकर्त्याचा होता. त्यांचा असा कोणताही चुकीचा हेतू नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींच्या सभोवताली एसपीजी जवानांची सुरक्षा होती. ज्याचा मोबाईल पंतप्रधानांसमोर पडला त्या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. एसपीजीनं नंतर त्याचा मोबाईल परत केला. महिलेचा मोबाईल फेकण्याचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. उत्साहाच्या भरात त्यांच्या हातून मोबाईल पडल्याचं सांगण्यात आलं.

दावणगेरेत सुरक्षा भेदण्याच्या प्रयत्नदावणगरेमध्ये पंतप्रधानंना रोड शो सुरू होता. तेव्हा दोन्ही बाजूला मोठी गर्दी होती. यादरम्यान, एकानं धावत पंतप्रधानांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांच्या वाहनादवळ पोहोचला. ती व्यक्ती त्यांच्या ताफ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. हा एक गंभीर प्रशअन मानला जात आहे. देल्या तीन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटक