शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections results 2018: बेळगावमध्येही भाजपा आघाडीवर; महाराष्ट्र एकीकरण समितीची पाटी अद्याप कोरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 09:51 IST

बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळण्याची सर्वात मोठी शक्यता आहे.

मुंबई: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगावातील जागांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार सध्या भाजपाने पाच जागांवर तर काँग्रेसने तीन जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर महाराष्ट्राला अपेक्षा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची पाटी अद्याप कोरी आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळण्याची सर्वात मोठी शक्यता आहे. त्यापैकी दक्षिण बेळगावमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. तर उर्वरित तीन जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आघाडीवर आहेत.मात्र, याठिकाणची मतमोजणी उशीरा सुरू झाल्याने प्राथमिक कल हाती येण्यास वेळ लागत आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 76 टक्के मतदान पार पडले आहे. मतदानाची टक्केवारी तुलनेने चांगली चांगली असल्याने निकालीची उत्सुकता वाढली आहे. या 18 मतदारसंघातून 203 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 184 पुरुष आणि 19 महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक तोंडावर असताना महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये फूट पडली होती. बंडखोर उमेदवार अपक्ष उभे राहिल्याने एकीकरण समितीची मते विभागली गेली होती. आजच्या निकालात याचा स्पष्ट फटका बसताना दिसत आहे. 

लाईव्ह अपडेटस्

भाजपा 6 जागांवर आघाडी, काँग्रेस 5 तर महाराष्ट्र एकीकरण समितीची एका जागेवर आघाडी

 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८