शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections results 2018: भाजपाचा हिंदुत्त्वाचा अजेंडा यशस्वी; लिंगायतांची व्होटबँकही अभेद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:03 IST

आजचे निकाल पाहता लिंगायत समाजाची व्होटबँक भाजपाच्या पाठिशी अभेद्यपणे उभे असल्याचे दिसून आले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता राजकीय तज्ज्ञांनी या निकालाचे विश्लेषण करण्यास सुरूवात केली आहे. त्यावरून या निवडणुकीत भाजपाचा हिंदुत्त्वाचा अजेंडा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची खेळी खेळली होती. त्यामुळे लिंगायत समाज काँग्रेसकडे वळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आजचे निकाल पाहता लिंगायत समाजाची व्होटबँक भाजपाच्या पाठिशी अभेद्यपणे उभे असल्याचे दिसून आले. लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या तब्बल 37 जागांवर भाजपाला विजय मिळाल्याचे समजत आहे. तर काँग्रेसला 18 आणि जनता दलाला (सेक्युलर) अवघ्या 8 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर दोन जागांवर अपक्षांना यश मिळाले. याशिवाय, काँग्रेसचा पारंपारिक मतदार असणाऱ्या मुस्लिम समाजानेही भाजपाला साथ दिल्याचे आश्चर्यकारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, मुस्लिम बहुल भागातील 10 जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच 8 आणि जनता दल 7 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे वोक्कलिंग समाजाने पुन्हा एकदा देवेगौडा यांच्या जनता दलालाच साथ दिली आहे. वोक्कलिंग समाजाचे प्राबल्य असलेल्या परिसरात जनता दल 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 9 आणि भाजपा 7 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याशिवाय, दलितबहुल मतदारसंघांमध्येही भाजपाने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला 16 आणि जनता दलाला फक्त 12 जागांवर आघाडी घेता आली आहे. 

 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८