शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections 2023: सीमेवर पोलिसांनी पकडला सव्वाचार कोटींचा मुद्देमाल, कोल्हापूर परिक्षेत्राची कारवाई

By उद्धव गोडसे | Updated: May 10, 2023 16:53 IST

नाक्यांवर २४ तास पोलिसांचा जागता पहारा

कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात पोलिसांनी ८८ लाखांच्या बेहिशोबी रकमेसह अवैध दारू, गुटखा, गांजा, संशयास्पद वाहने असा तब्बल चार कोटी ३५ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात सात शस्त्रांचाही समावेश आहे. २४ एप्रिल ते ८ मे दरम्यान ही कारवाई करण्यात आली.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर दोन्ही राज्यातील पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सातत्याने बैठका घेऊन आणि दोन्ही राज्यातील अधिका-यांनी समन्वय ठेवून बंदोबस्ताचे नियोजन केले होते. कोल्हापूर परिक्षेत्राकडून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यात सीमाभागात ४० तपासणी नाके सुरू केले होते. या नाक्यांवर २४ तास पोलिसांचा जागता पहारा होता.१५ दिवसात तीन जिल्ह्यात पोलिसांनी ८८ लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त केली. त्याशिवाय २० लाख रुपये किमतीची ३५ हजार लिटर दारू, १९ किलो गांजा, दोन लाख ३३ हजार रुपयांचा गांजा पकडला. दारू, गांजा आणि संशयास्पद वस्तूंची तस्करी करणारी ११ वाहनेही पोलिसांनी जप्त केली.अंमली पदार्थांच्या तस्करीसह मटका, जुगार अशा गुन्ह्यांमधील संशयित आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकणा-या २८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. तिन्ही जिल्ह्यातील ४० तपासणी नाक्यांवर एकूण दीडशे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात होते. यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत झाली, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकPoliceपोलिस